प्रतिनिधी
प्रविण चव्हाण
नंदुरबार -: शहरातील माळीवाडा परिसरातील जिल्हा परिषद शाळेजवळ गुन्ह्यातील फरार आरोपीस ताब्यात घेत असतांना पोलिस कर्मचाऱ्याची कॉलर पकडून धक्काबुक्की करीत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
या बाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार , नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यातील कर्मचारी सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश भिमराव सोनवणे व साक्षीदार हे नंदुरबार शहरातील माळीवाडा परिसरातील जिल्हा परिषदेच्या शाळे जवळ गुन्ह्यातील आरोपी बबलू उर्फ दीपक बुधा माळी यास ताब्यात घेण्यासाठी गेले होते .
यावेळी पोलिसांना पाहून बबलू माळी हा तेथून पळून जात असतांना पाठलाग करुन त्यास अटक करुन घेण्यास सांगितले . त्यावेळी बबलू माळी याने आरडाओरड करुन त्याचे साथीदार विलास माळी ( आयशरवाला ) , निलेश दिलीप माळी , गुलाब माळी व गब्बर भिका माळी सर्व . रा.माळीवाडा ता.नंदुरबार यांना बोलावून जमाव करुन अटकेस विरोध केला .
तसेच विलास माळी याने सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश भिमराव सोनवणे यांची कॉलर पकडून धक्काबुक्की केली . तसेच शासकीय कर्तव्य बजावत असतांना शासकीय कामात अडथळा निर्माण केला .
या बाबत सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश सोनवणे यांच्या फिर्यादी वरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात पाचही जणांविरुद्ध भादंवि कलम ३५३ , २२४ , २२५ , १४३ , १४७ , १४ ९ सह महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७ ( १ ) ( ३ ) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर आहेर करीत आहेत .
Users Today : 15