महागाईने दुखते डोके , गद्दारांना ५० खोके घोषणा देत राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केले आंदोलन…

Khozmaster
2 Min Read
प्रतिनिधी
प्रविण चव्हाण
नंदुरबार -: येथील राष्ट्रवादी शहर युवक काँग्रेसतर्फे देशात वाढत असलेल्या महागाई विरुद्ध आंदोलन करण्यात आले . महाराष्ट्र राज्याची परिस्थिती एकंदर खालोखाल जात आहे आणि अशी परिस्थिती असताना भारतीय जनता पार्टी आमदार खरेदी – विक्रीसाठी प्रचंड पैसा खर्च करीत आहे , एकेक आमदार विकत घेण्यासाठी अंदाजे ५०-५० कोटी रुपये आमदारांना दिले आहेत व त्यांच्या सुख सोयींसाठी त्यांना गुवाहाटीमध्ये त्यांच्यावर प्रचंड पैसा खर्च केला . यामुळे महागाईने दुखते डोके , गद्दारांना ५० खोके , ५० खोके , जनता भरते जीएसटी गद्दार जातात गुवाहाटी ५० खोके महागाई ओके , महागाई कशासाठी- आमदारांच्या – खरेदीसाठी अशा घोषणा देत महागाई विरोधात आंदोलन करण्यात आले .
    राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार साहेब , प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील , राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या सूचने नुसार राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉ . अभिजीत मोरे , राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस प्रदेश सचिव राऊ दिलीपराव मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज राष्ट्रवादी शहर युवक काँग्रेसतर्फे महागाई विरुद्ध आंदोलन करण्यात आले . राज्यात पावसामुळे जे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे तेथे लक्ष न देता नेत्यांनी फक्त स्वतःची कॅबिनेट कशी बनवायची , स्वतःचा पक्ष कसा वाचवायचा , ही सत्ता कशी वाचवायची याबद्दलच संपूर्ण शक्ती पणाला लावली आणि एकीकडे राज्यातील जनतेला मोकळे रस्त्यावर सोडून दिले .
     या विरोधात आज राष्ट्रवादी शहर युवक काँग्रेसने रस्त्यावर उतरून आंदोलन केले . लवकरात लवकर पावसामुळे झालेले नुकसान आणि वाढती महागाई यावर उचित व योग्य ते निर्णय नाही घेतले तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस यापुढे अधिक तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला .
     आंदोलना प्रसंगी राष्ट्रवादीचे नंदुरबार शहराध्यक्ष नितीन जगताप , राष्ट्रवादी नंदुरबार तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील , राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष लल्ला मराठे , विद्यार्थी सेलचे जिल्हाध्यक्ष बबलू कदमबांडे , युवक तालुकाध्यक्ष सुरेश वळवी , ओबीसी सेलचे जिल्हा समन्वयक निलेश चौधरी , शहर उपाध्यक्ष राजा ठाकरे , शहर कोषाध्यक्ष सुनिल राजपूत , अदनान मेमन , अनमोल पाडवी , राहुल जगदेव आदी उपस्थित होते .
0 9 4 5 5 0
Users Today : 15
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *