घरकुलासाठी लाभार्थ्यांनी कोणासोबतही आर्थिक व्यवहार करु नये – बिडीओ सावळे

Khozmaster
2 Min Read
महेंद्र हिवाळे चिखली प्रतिनिधी
चिखली. ग्रामीण भागातील गोरगरीब लाभार्थी उघड्यावर राहू नये यासाठी शासनाकडून घरकुल योजना गावागावात राबविल्या जात आहे. मात्र असे निर्देशनास आले की अनेक दलाल लाभार्थ्यांची दिशाभूल करुन पैशाचा आर्थिक व्यवहार करीत आहेत त्यामूळे फसव्या अफवा पासून सावध राहून कोणासोबतही आर्थिक व्यवहार करु नये असे गटविकास अधिकारी सावळे यांनी कळविले आहे.
ग्रामीण भागातील गोरगरीब लाभार्थ्यांना हक्काचे घर मिळावे यासाठी केंद्र शासनाकडून शंभर टक्के अनुदानावर विविध योजनेच्या माध्यमातून गोरगरीब लाभार्थीना घरकूल बाधून दिल्या जात आहे. त्यामध्ये ग्रामीण भागातील घरकुलासाठी अनुदान रुपये एक लाख तीस हजार रुपये दिल्या जात आहे. घरकूला साठी लाभार्थ्यांची निवड ही शासनाकडून आलेल्या याद्या आणि मिळालेल्या उदिष्ट नुसार व क्रमांका नुसार लाभार्थ्यांची निवड केली जाते. असे असतांना सुध्दा असे लक्षात आले की काही दलाल मंडळी गोरगरीब लाभार्थ्यांची दिशाभूल करुन तुमला घरकुल मिळून देतो पण त्यासाठी पैसे द्यावे लागतात आणि गोरगरीब लाभार्थी घरकुल मिळण्याच्या आशेपोटी त्यांना हजारो रुपये दिले जातात मात्र त्यांना पैसे देऊनही घरकुल मिळत नाही आणि नतर तक्रारी करतात त्यामूळे लाभार्थ्यांनी लक्षात घ्यावे की कोणत्याही योजनेचे घरकुल हे यादी नुसार व क्रमांका नुसार दिल्या जाते त्यामध्ये यादीतील वरचे नाव खाली घेण्याचा आणि खालचे नाव वरती घेण्याचा अधिकार कोणत्याही अधिकाऱ्यांना येत नाही . त्यामुळे अशा फसव्या अफवांना कोन्हीही बळी पडू नये, जर असे काही कोणाच्याही लक्षात आल्यास तात्काळ गटविकास अधिकारी सावळे यांना संपर्क साधावा असे कळविले आहे.
0 8 9 4 5 5
Users Today : 21
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *