ग्रामस्वराज्य अभियानांतर्गत आमचा गाव आमचा विकास ग्रामपंचायत विकास आराखडा सन २०२३ / २४ गणस्तरिय कार्यशाळा ग्रामपंचायत जामठा येथे दिनांक ८ व ९ नोव्हेंबर २०२२ ला पंचायत समिती सदस्य डोंगरगांव सर्कल उज्ज्वला रोशन खडसे यांचे अध्यक्षतेखाली पार पडली.या कार्यशाळेत आमचा गाव आमचा विकास अंतर्गत ग्राम विकास आराखडा सन २०२३ / २४ बाबत मार्गदर्शन प्रमुख प्रशिक्षक आरिफ अहमद एपीओ पंचायत समिती नागपूर तसेच अंगणवाडी सेविका श्रीमती विजयालक्ष्मी भेलावे यांनी मार्गदर्शन केले या कार्यशाळेला ग्रामपंचायत डोंगरगांव, सालई,पांजरी लोधी,मांगरुळ रे,पांजरी (बु)व जामठा येथील सरपंच, उपसरपंच तसेच सदस्य उपस्थित होते. या कार्यशाळेला जामठा चे ग्रामसेवक शैलेंद्र टेंभुर्णे ,पांजरी (बु) ग्रामपंचायत चे सचिव रवींद्र टेकाडे, पांजरी लोधी चे ग्रामसेवक व्हि.आर.निस्ताने,सालई च्या ग्रामसेवक निलीमा पारधी, डोंगरगांव चे ग्रामसेवक राजकुमार गजभिये, व सामाजिक कार्यकर्ते ताराचंद रोकडे इत्यादी मान्यवर या कार्यशाळेला उपस्थित होते या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ग्रामसेवक शैलेंद्र टेंभुर्णे यांनी मानले.
Users Today : 29