विशेष पोलिस उपमहानिरीक्षकांनी घेतला कायदा व सुव्यवस्थेचा आढावा

Khozmaster
1 Min Read
चंद्रकिशोर मीणा यांनी दिली अकोट येथे भेट पोलिस अधीक्षक कार्यालयात पार पडली बैठक
विनोद वसु प्रतिनिधी …
अकोला अकोला शहरासह जिल्ह्यात प्रारंभ झालेल्या गणेश महोत्सवाच्या अनुषंगाने अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी अकोला जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात आढावा घेतला. याशिवाय अकोट येथेसुध्दा चंद्रकिशोर मीणा यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर आदी पोलिस अधिकारी उपस्थित होते.
अमरावती परिक्षेत्रातील संवेदनशील जिल्ह्यातील शहर आणि तालुक्याच्या ठिकाणी अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी भेट देऊन कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. याशिव बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तरं यवतमाळ येथे भेट देऊन त जिल्ह्यातीलसुध्दा कायदा व सुव्यवस्थे आढावा घेतला आहे तर लवकर
वाशिम आणि अमरावती ग्रामीण या ठिकाणीही विशेष पोलि उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मीणा भेट देणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात चंद्रकिशोर मीणा यांनी घेतलेल्या कायदा व सुव्यवस्थेचा आढावा बैठकीला जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत, उपविभागीय पोलिस अधिकारी सुभाष दुधगावकर आदी पोलिस अधिकारी उपस्थित होते.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *