मुर्तिजापुर (भुषण महाजन) :- मुर्तिजापुर येथील माजी नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ता असलेले इब्राहीम घाणीवाला हे सदैव गोरगरीबांच्या कामाकरिता हजर असतात. समाजाबरोबरच त्यांनी इतर समाजातील लोकांचे कामे एकनिष्ठेने पार पाडली आहेत. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे अकोला उपाध्यक्ष, मुर्तिजापुर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष तसेच मेमन समाजचे अध्यक्ष असलेले इब्राहीम घाणीवाला यांच्या या कार्याची नवभारत ने दखल घेत त्यांना नवभारत अकोला गौरव पुरस्कार देवून सम्मानित करण्यात आले.
नवभारत अकोला गौरव पुरस्कार त्यांनी केलेल्या शैक्षणिक, उदयोग व सामाजिक कार्याबाबत मा. आमदार वसंत खंडेलवाल, माजी मंत्री अजहर हुसैन यांच्या हस्ते पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात आले.

Users Today : 23