वस्ताद लहूजी साळवे यांचे घराणे छत्रपतींचे विश्वासू-विठ्ठल कुलट

Khozmaster
1 Min Read
अडगाव येथे विर वस्ताद लहुजी साळवे जयंती  संपन्न
रितेश कुमार टीलावत प्रतिनिधी तेल्हारा
विर वस्ताद लहूजी साळवे यांचे घराणे निर्भय,लढवय्ये,पराक्रमी,विश्वासू व राष्ट्रभक्त व छत्रपतींचे विश्वासू होते.म्हणूनच छञपती  शिवरायांनी त्यांच्या पूर्वजांना शिकारखाना आणि पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी दिली होती असे प्रतिपादन प्रतिभा साहित्य संघाचे अध्यक्ष विठ्ठल कुलट यांनी केले. अडगाव येथे आयोजित विर वस्ताद लहुजी साळवे जयंती उत्सवात बोलतांना ते पुढे म्हणाले की लहूजींचे वडील राघोजी साळवे यांनी सतत बारा दिवस इंग्रजांशी निकराची झुंज देऊन त्यांना सळो की पळो करून सोडले होते.परंतू इंग्रजानी कपटाने त्यांना ठार केले.नंतर विर वस्ताद लहूजी यांनी तरुणांमध्ये  प्रेरणा व देशभक्ती जागवीण्यासाठी तालीम केन्द्र सुरू केले.महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक कार्याला मौलिक सहकार्य केले असून लहूजींचे ह कार्य आपला देश कधीच विसरणार नाही,असे असे ते म्हणाले..या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच अशोक घाटे होते.तर अकोला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.संगीताताई अढाऊ,माजी जि.प.सदस्य गोपाल कोल्हे, ठाणेदार चव्हाण,कविवर्य विठ्ठल कुलट,गावाचे सरपंच,उपसरपंच,पोलीस पाटील इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती.यावेळी वरील मान्यवरांनी भाषणातून विर वस्ताद लहूजी साळवे यांचा जीवनपट लोकांसमोर मांडला.कार्यक्रमाला गावकरी बंधू-भगीनी बहुसंख्येने उपस्थित होते.
0 9 4 8 0 5
Users Today : 45
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *