कालव्यांची कामे परिपूर्ण न झाल्यास शेतकऱ्यांनी सिंचन कसे करावे शेतकऱ्यांना पडला प्रश्न!

Khozmaster
5 Min Read
पाटबंधारे विभागाच्या कालव्या संबंधित प्रश्नाचा शेतकऱ्यांनी पाढाच यावेळी अधिकाऱ्यांसमोर वाचला….
अनेक प्रश्न शेतकऱ्यांसमोर टाकले आहेत
योगेश नागोलकार राहेर
पाटबंधारे विभागाच्या यांत्रिकी विभागाच्या मशनरी द्वारे कालव्याचे अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणचे कामे करून रब्बी हंगाम 2022 – 23 करिता शेतकऱ्यांनी 15 नोव्हेंबर2022 नंतर पाणी सोडण्याची मागणी यावेळी केली तसेच पाटबंधारे विभागाच्या कालव्याच्या संबंधित प्रश्नांचा पाडाच यावेळी वाचला यावर प्रशासनाने 15 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर दरम्यान सिंचनासाठी पाण्याची तजविज करण्यात येईल असे सांगितले अन्य प्रश्नांचे बाबतीत मात्र पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष संचालक कास्तकार यांचे अधिकाऱ्यांच्या त्रोटक उत्तराने कास्तकरांचे समाधान झाले नाही तसेच कालव्यांचे परिपूर्ण काम न झाल्यास शेतकऱ्यांनी सिंचन कसे करावे हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आ वासून उभा आहे तसेच कालव्याने साधे चालताही येत नाही बरेच ठिकाणी कालव्याची दुरुस्ती करणे अत्यंत गरजेचे आहे.
गवत मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे कॅनॉल अनेक ठिकाणी नादुरुस्त स्वरूपात आहेत यासह कालव्यांबाबत शेतकऱ्यांनी अधिकार्‍यांवर  प्रश्नांची सरबत्तीच केली मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पाटबंधारे विभागाच्या वतीने उत्तर देताना कालवा देखभाल दुरुस्तीसाठी शासनाकडून कुठलाही छदामही उपलब्ध झाला नाही त्यामुळे ज्या स्थितीत कालवा चालू आहे त्याच स्थितीत सिंचन शेतकऱ्यांना करावे लागेल असे कार्यकारी अभियंता वसूलकर पाटबंधारे विभाग अकोला यांनी यावेळी सांगितले.
 पातुर येथे कालवा सल्लागार समितीची सभा पाटबंधारे विभाग पातूर कार्यालयाच्या प्रांगणात पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष संचालक कास्तकार अधिकारी यांच्या समवेत गुरुवारी 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता पार पडली .यावेळी सभेचे अध्यक्षस्थानी पाटबंधारे विभाग अकोला कार्यकारी अभियंता वसूलकर हे होते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सभापती सौ .सुनीता अर्जुन टप्पे उपसभापती इमरान खान पंचायत समिती सदस्य सौ.अनिता अनिल राठोड, व उपविभागीय अधिकारी अनिल राठोड शाखा पातूर अभियंता आयुशी अग्रवाल शाखा ,अभियंता घाटे यांचेसह मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती.  सभेचे सूत्रसंचालन व आभार तराळे यांनी केले.
पातुर तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळालेच पाहिजे तसेच शेतकऱ्यांनी सुद्धा अधिकाऱ्यांना सहकार्य करावे व प्रशासनाने पाण्याचे व्यवस्थित नियोजन करून मशनरी ची योग्य दुरुस्ती देखभाल करावी व शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून द्यावे असे पातुर पंचायत समितीच्या सभापती सुनीता अर्जुन टप्पे यांनी यावेळी सांगितले.शेतकऱ्यांनी कालवा सल्लागार समितीच्या गुरुवारी पार पडलेल्या कलवा सल्लागार समितीचे सभेत शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पाटबंधारे विभागाच्या नाकर्तेपणाचा पाढा वाचून झोपेचे सोंग घेतलेल्या अधिकाऱ्यांना जागे करण्याचा प्रयत्न केला. मात्र अधिकाऱ्यांनी मागील दहा वर्षापासून संबंधित विभागात भरतीच झाली नाही त्यामुळे कर्मचारी वर्ग अपुरा आहे मशनरी सुद्धा ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत आहेत .पाणी वापर संस्थांना अद्यापही अनुदान मिळाले नाही अनेक ठिकाणी कालवे नादुरुस्त आहेत पाच नंबर मायनर कालवा खोदलाच नसल्यामुळे शेतीचे नुकसान होण्याची शक्यता आहे. जय किसान निर्गुणा प्रकल्पाला दोन वेळा पाणी पोहोचलेच नाही व अनेक ठिकाणी कालव्याची  दुरुस्ती करण्यात आली नाही .गवत मोठ्या प्रमाणात वाढले तर काही ठिकाणी देऊळगाव मायनर कालवा बुजू नये व पाण्याचा प्रवाह हा सारख्या प्रमाणात असला पाहिजे . डाव्या कालव्याची दुरुस्ती करावी. बोलना प्रकल्पाला पाणी किती किलोमीटर पर्यंत पाणी देणार तसेच फुल स्ट्रेंनथने पाणी सोडल्यास शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे तसेच याला ड्रेनही नाहीत पाणी पत्रक सुद्धा तयार करणे गरजेचे आहे .यासह अनेक प्रश्न शेतकऱ्यांनी या सभेत उपस्थित केले त्यावर संबंधित अधिकारी वर्गाने उत्तर देण्याचा प्रयत्न केला मात्र शेतकऱ्यांचे यामुळे समाधान झाले नाही यावेळी अनेक शेतकऱ्यांनी असंतोष देखील व्यक्त केला. या सभेला चरणगाव देऊळगाव बाबुळगाव कोठारी पास्टोल शिरला खानापूर आलेगाव कारला सस्ती महसूल पार्टी आगीखेड यांच्यासह तालुक्यातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती.या सभेसाठी पाटबंधारे विभागाच्या  श्री तरोळे, गुलाब सावंत कपिल तरोडे पांडुरंग भगत प्रवीण गवई मंगेश नवघरे रवींद्र जायभाये गणेश यादव विजय काळे रूपाली भांडे शिल्पा सुरजुसे यांनी अथक परीश्रम घेतले.कालवा समितीच्या सभेला  पाणी वापर संस्थेचे  अर्जून टप्पे सुनील गाडगे गोपाल पाटील म्हल्ले  प्रशांत बंड विजय काळपांडे संतोष घुगे अनिल राठोड संजय पाचपोर धनंजय ऊपर्वट विठ्ठल काळे  अबुल हसंनखा किरण गिरे योगेश काळे सुरेश मानकर रमेश सोळंके अध्यक्ष संचालक कास्तकार यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.
प्रतिक्रिया ….डाव्या कालव्याची डागडूजी करण्याची मागणी  यावेळी केली.
सुनील गाडगे शेतकरी…. पाणी वापर संस्थांना अद्यापही अनुदान मिळालं नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे समाधान झाले नाही अधिकारी व शेतकरी यांच्यामध्ये बराच वेळ पर्यंत चर्चेत सुरू होती मात्र काहीच निष्पन्न झाले नसल्याने शेतकऱ्यांनी असंतोष व्यक्त केला
पांडुरंग गिरे आलेगाव
…. प्रतिक्रया ….
मोरणा प्रकल्पाला पाणी किती किलोमीटर पर्यंत पाणी देणार तसेच फुल प्रवाहाने पाणी सोडल्यास शेतकऱ्यांचे शेतीचे मोठे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे . याला ड्रेन  सुद्धा उपलब्ध नाहीत व पाणी पत्रक तयार करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
 संतोष घुगे  पास्टूल
0 9 4 8 0 5
Users Today : 45
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *