प्रतिनिधी रामेश्वर वाढी पातुर
काँग्रेस शासित राज्यात जुनी पेन्शन योजना लागू केल्यामुळे राहुल गांधी यांचे आभार मानणार- वितेश खांडेकर राज्य अध्यक्ष महाराष्ट्र जुनी पेन्शन संघटना
तालुका जुनी पेन्शन संघटनेची मा राहुलजी गांधी यांच्या भारत जोडो याञेत सहभाग घेऊन काँग्रेस शासित राज्यात राज्य कर्मचार्यांना जुनी पेन्शन योजना लागु केल्याने आभार मानण्याकरिता राज्यभरातून पाच हजार जुनी पेन्शन संघटनेचे कार्यकर्ते येणार आहेत महाराष्ट्र जुनी पेन्शन संघटनेचे राज्य अध्यक्ष वितेश खांडेकर अमरावती विभाग प्रमुख मिलिंद सोळंके हे सुध्दा राहुलजी गांधी यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत जिल्हा अध्यक्ष अमोल गुडघे सर, वाघ सर यांचे मार्गदर्शनात भारत जोडो याञेत येणाऱ्या जुनी पेन्शन संघटनेच्या कार्यकत्याकरिता नियोजनपर सभा घेऊन नियोजन करण्यात आले सभेला तालुका अध्यक्ष उपाध्यक्ष व जुनी पेन्शन संघटनेचे तालुक्यातील बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते
बाहेरुन येणाऱ्या करिता पातुर येथे सिदाजी महाराज मंगल कार्यालय ग्राउंड व तुळसाबाई कावल विद्यालय बाभुळगाव येथे मुक्कामाची नियोजित व्यवस्था करण्यात आली आहे
मा.राहुलजी गांधी यांची भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्रात आगमन झाले आहे.काँग्रेस शासित राज्य असलेले राजस्थान व छत्तीसगड येथे जुनी पेन्शन लागु करण्यात आली आहे.तसेच हिमाचल प्रदेश व गुजरातमध्ये विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने आपल्या वचननाम्यात जुनी पेन्शनचा मुद्दा प्रथम घेतला आहे आता आपला जुनी पेन्शन हा मुद्दा सर्वच राजकिय अजेंड्यावर असुन राज्याभर जवळपास सात लाख कर्मचार्यांची मागणी जुनिच पेंशन मिळावी अशी आग्रही मागणी आहे सध्या मुद्दा चर्चेत आला असुन राजकिय दुष्टया मुद्दा महत्त्वाचा बनला आहे ईतर राज्याप्रमाने . महाराष्ट्रात सुध्दा परिवर्तन घडवून आणण्यासाठी आपण सर्वांनी १७ नोव्हेंबर रोजी पातुर जि.अकोला येथे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने २००५ नंतर लागलेल्या सर्व विभागातील कर्मचाऱ्यांनी मा.राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत भाग घेऊन त्या यात्रेत आपल्या सर्वांना सहभाग घ्यावयाचा आहे.तरी सर्वांनी १६ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी पातुर येथे मा राहुलजी गांधी मुक्कामी असल्याने आदरणीय राहुलजी गांधी यांच्या सोबत संघटनेच्या अध्यक्षा सह पदाधिकारी यांची चर्चा राहुलजी गांधी मुक्कामी असल्याने घडवून येणार आहे तरि आपली संख्या प्रत्यक्ष बहुसंख्येने आपल्याला उपस्थिती लावायची आहे शक्यतो आपल्याला १६/११/२०२२ रोजी पातुर येथे संध्याकाळी मुक्कामी येऊन दुसऱ्या दिवशी १७/११/२०२२ रोजी मा राहुलजी गांधी यांच्या सोबत भारत जोडो पायदळ याञेत बहुसंख्येने सहभागी व्हायचे आहे आपण उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन अनिल आयस्कार यांनी केले आहे सभेला तालुक्यातील विजय वाटोरे छगनलाल आडे मनोन पेंढारकर राजेश डाखोरे प्रदिप मेसरे विनोद भोसले सूरेश राऊत प्रदिप राठोड प्रशांत फुटाणे मंगेश सुळके कैलास लठाड मोहम्मद जुबेर तरिक्कु रहेमान साजित खान असरार अहमद सुनिल वावगे सतीश सिरसाट अ रहेमान व तालुका अध्यक्ष सुधाकर पांडे उपाध्यक्ष नामदेव जाधव इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
स्थळ-सिदाजी महाराज मंगल कार्यालय ग्राउंड बाळापूर रोड पातुर जि अकोला येथे बहुसंख्येने उपस्थित राहावे.
Users Today : 45