भारत जोडो यात्रेच्या स्वागतासोबतच होत आहे प्रश्नांचा भडीमार शहरातील सर्व सामान्य नागरिकांच्या व्यथा खा.राहूल गांधी यांनी जाणून घ्याव्या..संयोजक पातूर तालुका विकास मंच शिवकुमारसिंह बायस

Khozmaster
2 Min Read

प्रतिनिधी रामेश्वर वाढी 

पातूर वार्ता दि.१६ – शहरात गांधी परीवारातील राजपुत्र असलेले काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस खा.राहुल गांधी यांचे आगमन होत आहे.शहरात कधी न होणारी नागरिकांची अफाट गर्दी रस्त्या रस्त्यावर बघायला मिळत आहे.शहराला अफाट यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.शहराला शासकीय सुरक्षा यंत्रणांनी चोहो बाजूंनी घेरून एकप्रकारे छावणीचे स्वरूप आले आहे.भारत जोडो यात्रा ज्या प्रमुख रस्त्यावरून जात आहे त्याच्या दोन्ही बाजूस कांग्रेस पक्षासह इतर प्रतिष्ठीत नागरिकांचे स्वागताचे निमित्ताने लागलेले शेकडो बॅनर बघायला मिळत आहेत.

  याच ठिकाणी छोटे छोटे उद्योग व्यवसाय करणा-यांची अनधिकृत असलेले अतिक्रमण प्रशासनाने जेसीबीने काढले त्यातही दूजाभाव झाल्याने नागरिकांमध्ये कमालीची नाराजी बघायला मिळत आहे.

  शुभेच्छांच्या वर्षाव शेंकडों बॅनर द्वारे होत असतांना त्यामध्ये फक्त पातूर तालुका विकास मंचाच्या एकाच बॅनरची चर्चा शहरात रंगली आहे.

त्याचे कारण पातूर तालुका विकास मंचानी बॅनरद्वारे भारत जोडो यात्रेचे स्वागत करून कांग्रेस पक्षाची सत्ता असलेल्या नगरपरिषदेच्या अकार्यक्षमतेवर निशाणा साधत अनेक प्रलंबित असलेल्या प्रश्नांचा भडीमार केल्याचे दिसून येत आहे.

  त्यामध्ये नागरिकांना हव्या असलेल्या त्यांच्या मूलभूत गरजा उदा.विविध रस्ते,अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली पाण्याची सुजल निर्मल जल योजना,अत्याधुनिक ग्रामीण रूग्णालय,घरकुल योजना,खेळांचे मैदान,प्रौढ व लहान मुलांसाठी उद्यान,नदी सुधार प्रकल्प, मैलाशुद्धीकरण प्रकल्प,भुमिगत सांडपाण्याची व्यवस्था,भुमिगत इलेक्ट्रीक वायरिंग अशा अनेक प्रकारचे सामान्य नागरिकांस उद्भवणारे मुद्दे उपस्थित केले आहेत. आता हे बघणे औत्सुक्याचे ठरेल की याचे उत्तर या यात्रेत सर्व सामान्य जनतेला मिळतात की मिळत नाही.

   पातूर तालुका विकास मंचाचे संयोजक ठाकूर शिवकुमारसिंह बायस यांनी सरळ सरळ शहरातील कांग्रेसच्या सत्ताधारींवर निशाणा साधल्याचे दिसत आहे.

0 9 4 8 0 7
Users Today : 47
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *