रितेश कुमार टीलावत प्रतिनिधी तेल्हारा
स्थानिक सेंट पॉल स्कूल हिवरखेड येथे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरू अर्थात चाचा नेहरू यांची जयंती बाल दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली .प्रसंगी शाळेमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी विद्यार्थ्यांनी चाचा नेहरू यांच्या वेशभूषांमध्ये चाचांचे विचार व्यक्त केले. कू.रेणुका नागपुरे मॅम यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जीवनाबद्दल बद्दल माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री चंद्रकांत तिवारी सर , सौ निमिता गांधी मॅम उपस्थित होत्या .प्रमुख पाहुणे सौ विमल येऊल व सौ छाया अवरे, रविंद्र वसे, नितिन कोल्हे उपस्थित होते बाल दिनानिमित्त शाळेमध्ये तिसरी ते दहावीपर्यंतच्या मुलींना गुड टच अँड बॅड टच बद्धल माहिती देऊन त्यांना छोटी फिल्म दाखवण्यात आली. या कार्यक्रमाचे संचालन मयुरी आमले तर आभार प्रदर्शन मीरा डेरे मॅम यांनी केले. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष नवनीतजी लाखोटीया सचिव ,प्रमोद चांडक लूनकरंजी डागा यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम घेण्यात आला .
Users Today : 47