श्रद्धा हत्याकांडाचा श्रीमंत बाबा गणपती मंडळा तर्फे तीव्र निषेध.

Khozmaster
1 Min Read
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार
मुंबई येथील रहिवासी असलेल्या श्रद्धा या युवतीचा दिल्ली येथील आफताब नावाच्या नराधमाने अत्यंत क्रूर पद्धतीने  35 तुकडे करून निर्दयीपणे खून केला. समाज मनाला काळीमा फासणाऱ्या श्रद्धा हत्याकांडातील  नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करीत तीव्र शब्दात श्रीमंत बाबा गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला.
संपूर्ण देशाला हाद्रवून टाकणाऱ्या श्रद्धा हत्याकांडाचा  जगभरातून निषेध होत आहे.या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी सोनार गल्ली परिसरात श्रीमंत बाबा गणपती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध व्यक्त करून घोषणा दिल्या.भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी न्याय व्यवस्थेने तात्काळ निर्णय लावून आफताब सारख्या नराधमाला फाशीची शिक्षा ठोठावण्याची मागणी श्रीमंत बाबा गणपती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *