उमरा येथे आढळला मानवी कवडी हाड सांगळा

Khozmaster
1 Min Read
गावात पसरली एकच दहशत
योगेश नागोलकार
राहेर येथून जवळच असलेल्या चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत येथ  असलेल्या उमरा गावात गुरुवारी मानवी मानवी कवडी हाड सांगाळा आढळून आला होता.या बाबत पोलिसांना माहिती मिळताच चांन्नी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रात्री उशिरापर्यंत पुरावे गोळा करण्याचे काम सुरू होते.विशेष म्हणजे याच गावातील एक वृद्ध बेपत्ता असल्याची तक्रार असून,या सांगाळ्याच्या ठिकाणी आढळून आलेले साहित्य वृद्धाच्या कुटुंबियांनी ओळखले आहे,त्यामुळे हा सांगाळा त्या बेपत्ता वृद्धाचा शक्यता वर्तविण्यात येत आहे.उमरा येथील सरकारी दवाखान्याच्या मागे मानवी मृतदेह असल्याची माहिती ग्रामस्थांनी चांन्नी पोलिसांना दिली होती.त्या नुसार चांन्नी पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता त्या ठिकाणी मानवी कवठी, कुजलेली हाडे,धोतर,बंडी,काठी,जोडा,चष्मा,टोपी आदी साहित्य आढळून आल्याने पी। एस आय गणेश महाजन यांनी सांगितले.तसेच उमरा येथील 90 वर्षीय इसम बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.त्यामध्ये बूट, धोतर, बंडी, चष्मा,असे साहित्य परिधान केलेला व वयोमानानुसार काही आठवत नसल्याचेही नमूद करन्यात आले होते.आज सापडलेले साहित्य या बेपत्ता इसमाच्या साहित्याशी साम्य दाखवीत असून,त्याच्या कुटुंबीयांनी ते ओळखले आहे.त्यावरून सदर सांगाळा हा बेपत्ता असलेल्या इसमाचा  असल्याचा संशय व्यक्त होत आहे.मात्र हा सांगाळा अकोला येथे पाठवून प्राथमिक माहिती घेण्यात येणार आहे.त्यानंतर तो फॉरेन्सिकलॅब मध्ये पाठविण्यात येणार आहे.असे महाजन यांनी सांगितले.या प्रकरणी चांन्नी पोलीस स्टेशनला मर्ग दाखल करण्यात आला असून,पुढील तपास महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
0 9 4 8 0 7
Users Today : 47
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *