रितेश कुमार टीलावत तालुका प्रतिनिधी तेल्हारा
हिवरखेड येथील कै. रामदास मारोती ताळे यांचा विहीरीत पडुन आकस्मिक निधन झाले होते. सदर मयत यांच्या नावे पंतप्रधान सुरक्षा बिमा योजनेअंतर्गत विमा काढलेला होता..सदर मयताचे वारसदार श्री. विनोद रामदास ताळे यांना 2,00,000 रुपये निधी सेन्ट्रल बॅक आॅफ इंडिया , शाखा हिवरखेड यांच्या सहाय्याने आज प्राप्त झाला. सेन्ट्रल बॅक आॅफ इंडिया , शाखा हिवरखेड यांच्याकडुन खातेदारांना पंतप्रधान सुरक्षा बिमा योजना (वार्षिक – 20 रूपये ) तसेच पंतप्रधान जिवनज्योती योजना (वार्षिक – 436 रूपये ) घेऊन विमा कवच देण्यात येते. केंद्र सरकारने काही वर्षापूर्वी खूप कमी प्रीमियममध्ये प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना सुरू केली होती. पीएमएसबीवायचा वार्षिक प्रीमियम केवळ 20 रुपये आहे. प्रत्येक वर्षीच्या मे महिन्याच्या अखेर तुम्हाला हे प्रीमियम भरावे लागणार आहे. तुमच्या बँक खात्यामधून ३१ मे रोजी ही रक्कम आपोआप कट केली जाईल. जर तुम्ही पीएमएसबीवाय योजनेचा लाभ घेतला असेल तर तुम्हाला तुमच्या बँक खात्यात काही रक्कम ठेवणे आवश्यक आहे.तर दुसरी पंतप्रधान जीवन ज्योती योजना एक वर्षाचे विमा संरक्षण असणारी हि एक आयुर्विमा योजना आहे. दर वर्षी नूतनीकरण आवश्यक. बँका व भारतीय आयुर्विमा महामंडळ यांच्या सहयोगाने या योजनेचे परिचालन केले जाते. या योजनेत विमाधारकाचा कुठल्याही कारणाने मृत्यू झाला तर वारसास रु. २ लाख भरपाई मिळेल तरी सर्व सेंट्रल बँकेच्या खातेदारांनी सदरहू योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन सेंट्रल बँक शाखा हिवरखेडचे शाखाधिकारी अनंत पाटील यांनी केले आहे.
Users Today : 47