प्रबोधनकार ..
कोदंडाचा टणत्कार
ठाकरे प्रबोधनकार
शृढरूढी जखडल्या
समाजा देई आकार
आचरणी तंतोतंत ते
महात्मा फुले विचार
सडेतोड न् बिनतोड
बोल तैसेचि आचार
लेखन कृती वकृत्व
तीन लाडके हत्यार
पत्रकारितालखलख
सुधारणेचे मुखत्यार
हुंडा प्रतिबंधक सेना
अडे नारी अत्याचार
बालविवाहास विरोध
दिला कलिकाआधार
विधवा केशवपनाला
प्रबोधनावरती मदार
आधि समाज संसार
नंतर आपले घर दार
तत्व विवेचक प्रेस ती
सक्षम माध्यम प्रसार
प्रबोधन पाक्षिकातून
वाहू लागी अमृत सार
बहुरंगी साहित्यशक्ती
मार्ग दर्शक ती अपार
रे पुढच्या शतकातही
ते ताजे त्यांचे विचार
– हेमंत मुसरीफ पुणे
९७३०३०६९९६
Users Today : 9