इंदिरा गांधी .
भारतरत्न इंदिराजी
जागे सदा आठवणी
काटेरी सिंहासनावर
मुर्ती विराजे देखणी
सर्वोच्च पदस्थ नारी
मुत्सद्दी राजकारणी
पाकविरूद्ध युध्दात
जागली रण रागिणी
प्रगतीला मिळे गती
दूरदर्शी ती आखणी
बॅंकाचे राष्ट्रीयीकरण
जन तव सदैव ऋणी
हिरा चपखल चमके
भारत भूमी कोंदणी
गुणांचे जाहले चीज
भरूनि वाही रांजणी
गर्भ श्रीमंतीत असूनि
वेदनादीनांच्या जाणी
गरिबी हटाव विचारां
कार्यशैली वाखाणणी
आत्मघातकी हल्ला
गमावली सारथीगुणी
आता उरल्या केवळ
आठवणी क्षणो क्षणी
– हेमंत मुसरीफ पुणे
९७३०३०६९९६.
Users Today : 8