गोपीनाथजी ..
अनाथनाथगोपीनाथ
रत्न एखादे लाखात
हसूं दुजाच्या सुखात
अश्रूं गिळले दु:खात
संकल्पविकल्प भले
सुरेख केली सुरवात
उजळे भविष्य खूप
जशी समयीत वात
मित्रपाहे विरोधकात
कमळफुले चिखलात
प्रयोग शील सृजनता
उन्मेष ये रोमा रोमात
ऊसतोड कामगारांना
साथ दिली संघर्षात
तोट्यातले कारखाने
यत्ने आणी उत्कर्षात
विजयी ध्वज हातात
संघर्ष भरला रक्तात
स्नेह भावही अंतरात
भगवान बाबा भक्तात
भर भरून दिले सुख
केला शेवटी आघात
ऐनउमेदीच्या काळात
दु:खा लोटूनि गेलात
– हेमंत मुसरीफ पुणे
9730306996..
Users Today : 8