सर्वोपचार रुग्णालयातील रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा, रक्तदानासाठी उमेश इंगळे यांचा पुढाकार

Khozmaster
2 Min Read
 प्रतिनिधी रामेश्वर वाढी ,अकोला
रक्तदान करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य महासचिव उमेश सुरेशराव इंगळे यांनी पुढाकार घेतला आहे स्थानिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून रक्ताचा तुटवडा आहे. यामुळे आपत्कालीन परिस्थिती, अपघात आणि गरोदर महिला तसेच सिकलसेल आणि थॅलेसेमिया ग्रस्त बालकांसाठी रक्तदान करण्यास विलंब होतो. रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून रक्तदात्यांनी रक्तदान करण्याचे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने केले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालय पश्चिमविदर्भात मोठे आणि आधुरामेश्वर वाढी निक रुग्णालय आहे. येथे दररोज अकोला जिल्ह्यातील तसेच लगतच्या वाशिम, बुलढाणा, अमरावती, जळगाव, हिंगोली, ग्रामीण भागातून सुमारे 400 ते 500 रुग्ण उपचारासाठी येतात. यामध्ये दररोज 40 ते 50 रुग्ण उपचारासाठी दाखल होतात, छोट्या-मोठ्या शस्त्रक्रिया केल्या जातात. त्यासाठी रुग्णालयाला मोठ्या प्रमाणात रक्ताची आवश्यकता असते. येथील रुग्णांना मोफत रक्तपुरवठाही केला जातो. त्यामुळे रक्तपेढीत रक्ताला मोठी मागणी असली तरी सध्या या रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा आहे.ती आहे त्यामुळे रुग्णांना रक्त देण्यासाठी कर्मचाऱ्यांची अडचण होत असून रुग्णांचे नातेवाईक रक्तासाठी वणवण भटकत आहेत. दरम्यान, या सुविधेपासून रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी जिल्ह्यातील रक्तदात्यांनी रुग्णालयात रक्तदान करण्याचे आवाहन रुग्णालय प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.सध्या सर्वोपचार रुग्णालयाच्या रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा आहे. रुग्णांची काळजी घेण्यासाठी सदैव तत्पर आहे. त्यामुळे रुग्णांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी जिल्ह्यातील विविध शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांसह सामान्य सिव्हिल हॉस्पिटलच्या रक्तपेढीत रक्तदान करावे.त्यामुळे रुग्णांचे प्राण वाचवण्याचे दिव्य काम आपल्या हातून घडू शकते.असे आवाहन शासकीय सर्वोपचार रुग्णालय प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते परंतु कोणत्याही प्रकारची मदत झाली नाही. *म्हणून रक्तदान करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य महासचिव उमेश सुरेशराव इंगळे यांनी पुढाकार घेतला आहे ते स्थानिक राजकीय पदाधिकारी,आजी,माजी नगरसेवक, स्थानिक महाविद्यालय, सामाजिक संघटना, कोचिंग क्लासेस,युवकांचे ग्रुप, विविध संघटना, ऑटोरिक्षा युनियन,तसेच राजकीय पक्ष यांना पत्र पाठवून रक्तदान शिबीरे आयोजित करण्यासंदर्भात आवाहन करणार आहेत व जास्तीत जास्त लोकांपर्यंत रक्तदान करावे या करीता आवाहन करतिल.व खरोखरच ज्या लोकांना समाजसेवा व रुग्णसेवा करायची आहे ते लोक आपल्या पत्राच्या मागणिनुसार रक्तदान शिबीरे आयोजित करतिल व शासकीय सर्वोपचार रुग्णालयातील रक्तपेढीतिल रक्ताचा तुटवडा भरुन काढतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे
0 9 4 8 0 7
Users Today : 47
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *