नुकतेच कोथरूड पुणे येथील एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतील स्वामी विवेकानंद सभागृहात राष्ट्रीय सरपंच अधिवेशन भरवण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन भारत सरकारच्या केंद्रीय राज्यमंत्री मा.सौ. डॉ. भारतीबाई पवार यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष एम आय टी वर्ल्डपीस युनिव्हर्सिटी पुणे संस्थेचे संस्थापक मा.राहुल कराड हे अध्यक्ष होते.पुणे येथे राष्ट्रीय सरपंच संसदच्या महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्षाची निवड करण्यात आली.या कार्यक्रमात टोकाई सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष तथा हिंगोली जिल्हा सरपंच संसदेचे अध्यक्ष मा. शिवाजीराव सवंडकर यांना श्री माननीय राहुल जी कराड व मा.योगेश पाटील यांच्या हस्ते जिल्हाध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र देवून सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी भारतीय छात्र संसद व वुमन्स एम आय टी पुणे, शिक्षण संस्था समुह माननीय योगेश पाटील, श्री डॉ. विश्वनाथ कराड, श्री.व्यंकटेश जोशी, श्री.प्रकाशजी महाले, श्री.संजय बाबर, श्री भाऊसाहेब घुगे,गोपाळ पाटील,श्री.रणजितसिंह कामठेकर, श्री.श्रीपाद कुलकर्णी व मराठवाडा, विदर्भ, खानदेश, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, व उत्तर महाराष्ट्र या सर्व विभागातून सरपंच मंडळी व पदाधिकारी मंडळी या अधिवेशनास हजर होती.मा.शिवाजीराव सवंडकर यांच्या जिल्हाध्यक्ष निवडीचे रेडगाव,डोंगरकडा,वडगाव तसेच जिल्ह्यात अभिनंदन होत आहे.
Users Today : 8