आळंदीच्या यात्रेत यात्रेकरूंना ब्लॅंकेटचे वाटप

Khozmaster
1 Min Read

खोजमास्टर ग्रुप ऑफ मिडिया

आळंदी : कार्तिक एकादशी आळंदीची यात्रा असल्याने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह आजूबाजूच्या इतर राज्यातून लाखों वारकरी दरवर्षी माऊली संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचे दर्शनासाठी मोठ्या भक्तीभावाने येतात.

मागील दोन दिवसांपासून लाखोंच्या संख्येने वारकरी मंडळी आपापल्या दिंड्या घेऊन आळंदीत मुक्कामी आले आहेत.थंडीचे दिवस असल्याने काहींना त्याचा त्रास होत असतांना ची बातमी पिंपरी चिंचवड शहरातील राजपूत संघटनेला मिळाली त्या अनुषंगाने राजपूत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी सामाजिक भावनेतून थंडीपासून वारकरी मंडळींचे बचाव करण्यासाठी त्यांना मोफत ब्लॅंकेट देण्याचा निर्णय घेतला व प्रत्यक्ष पाहणी करून ज्या वारकरी मंडळींना खरंच गरज आहे व जे थंडीने कुडकुडत आहेत अशांना उबदार असलेले ब्लॅंकेटचे त्यांच्या जागेवर जावून त्याचे मोफत वाटप केले.

यावेळी ज्यांना ज्यांना ब्लॅंकेट मिळाले त्या सर्वांनी संघटनेच्या कार्याचे कौतुक करून खुप आशिर्वाद दिले.

ब्लॅंकेटचे मोफत वाटप कार्यक्रम यशस्वीतेसाठी पिंपरी चिंचवड राजपूत संघटनेचे अध्यक्ष शिवकुमार बायस, उपाध्यक्ष प्रविण राजपूत,खजिनदार राणा अशोक इंगळे,सोशल मीडिया प्रमुख गणेश राजपूत,रूपीनगर प्रभाग प्रमुख ललीत पवार यांच्या सह विक्रम बायस,राजेंद्र सिंह राठौड,रवी कच्छवे, युवराज समर्थ इंगळे, रूग्णसेवक संघटना भोसरी विधानसभा अध्यक्ष संदीप चव्हाण,पातूर तालुका विकास मंचाचे सुभाष सिरसाठ व इतर मान्यवर मंडळींनी अथक परिश्रम घेतले.

0 9 4 6 3 7
Users Today : 51
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *