शेतकर्यांनी आधुनिक पद्धतीने भाजीपाला लागवड करून उत्पादन वाढवावे : तालुका कृषी अधिकारी माणगाव

Khozmaster
2 Min Read

बोरघर माणगाव विश्वास गायकवाड

मंगळवार  कृषि विभाग माणगाव कृषि तंत्रज्ञान व्यवस्थपन यंत्रणा (आत्मा) व प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण यांचे संयुक्त विद्यमाने सर्व विकास दिप संस्था, माणगाव येथे आदिम जमाती विकास व संवर्धन या योजने अंतर्गत एकात्मिक रोग कीड नियंत्रण व भाजीपाला उत्पादन या विषयाचे प्रशिक्षण घेण्यात आले.
या प्रशिक्षणावेळी तालुका कृषी अधिकारी माणगाव श्री. एन .वाय .घरत यांनी प्रशिक्षणार्थींना कृषी विभागाच्या विविध योजना कृषी यांत्रिकीकरण, आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून भाजीपाला लागवड ,बांबू शेती तसेच कृषी पूरक व्यवसाय इत्यादी बद्दल सखोल मार्गदर्शन केले.
     या प्रशिक्षणासाठी डॉ.मनोज तलाठी कार्यक्रम समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र किल्ला- रोहा यांनी उपस्थित राहून आदिवासी महिला शेतकरी बांधवांना वेलवर्गीय भाजीपाला लागवड पद्धती , बियाणे निवड , मशागत ,कीड व रोग याबद्दल सखोल मार्गदर्शन केले. यावेळी श्री. रामचंद्र रावजी कदम उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त शेतकरी, तालुका पोलादपूर यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांना त्यांचे अनुभव कथन करून सांगितले, यावेळी त्यांनी स्ट्रॉबेरी लागवड , पपई लागवड ,आले लागवड या नवनवीन प्रयोगांबद्दल मार्गदर्शन केलं त्याचबरोबर बाजारपेठेतील वाढती मागणी, सेंद्रीय शेतमाल उत्पादन, सेंद्रीय निविष्ठा तयार करणे, विक्री व्यवस्था, यावर मार्गदर्शन केले. श्री.महेश मोरे यांनी आदिवासी महिला शेतकरी गट सद्य स्थितीत घेत असलेले सेंद्रीय शेतमाल उत्पादन, याबाबत माहिती दिली.
     या प्रशिक्षणाचे नियोजन श्री. प्रमोद शिंदे, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा ,माणगाव यांनी केले, या प्रशिक्षणासाठी तालुक्यांतील महिला,शेतकरी गटाचे ७५ सभासद उपस्थित राहून प्रशिक्षणाचा लाभ घेतला, यावेळी प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण साहित्य आणि प्रमाणपत्र मान्यवरांचे हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी सौ. कमळ वाघमारे व शेवंती जाधव या महिला शेतकऱ्यानं उत्कृष्ट भाजीपाला शेतकरी म्हणून प्रशस्तीपत्रक मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरव करण्यात आला. या वेळी श्री.आर.डी .धुरी कृषी सहायक, श्री कपिल पाटील तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक पोलादपूर, सर्व विकास दिप संस्था, माणगाव, यांचे सर्व समन्वयक आणि कृषि विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
0 9 3 7 4 2
Users Today : 23
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *