रिक्षा ..
भले हिणवावे कुणी
खडखड चाले रिक्षा
सामान्य माणसाची
परिपूर्ण करे अपेक्षा
महिला फिरेती मुक्त
जाणवू लागे सुरक्षा
बेकारांची काहीशी
संपूनि गेली प्रतिक्षा
ऑनलाईनची सवय
मुले देतीलं परिक्षा
कर्जमाफी व्यवस्थित
पु-या होती आकांक्षा
झाडांना श्वासमोकळा
करणारे आलेत रक्षा
प्रदूषित नको मने ती
बागडू द्या जरा पक्षा
कोरोनाने छळ छळले
दिधली भरपूर शिक्षा
सावरे बिघडली घडी
बदलू लागलायं नक्षा
करावे कौतुक मोकळे
उगाचचं भांडण्यापेक्षा
चांगभले होई अजून
जरुर वाढवा अपेक्षा
– हेमंत मुसरीफ पुणे
९७३०३०६९९६
Users Today : 8