रितेश कुमार टीलावात तेल्हारा प्रतिनिधी
यावर्षी मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान झालेले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत ओढून आले यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाहते पाणी उपलब्ध आहे. पिकांना संरक्षित पाणी देण्याकरिता व पाण्याचे संधारण होऊन भूजल पातळीत वाढ होण्याच्या दृष्टीने कृषी विभागामार्फत वनराई बंधाऱ्याचे काम मोहिम स्वरूपात करण्यात येत आहे.त्याच अनुषंगाने तालुका कृषि अधिकारी श्री नरेंद्र राठोड व मंडळ कृषी अधिकारी श्री गौरव राऊत यांच्यासह सर्व हिवरखेड मंडळातील कृषि पर्यवेक्षक व कृषि सहाय्यक यांनी श्रमदानातून वनराई बंधाऱ्याचे काम पूर्ण केले.यामध्ये गावातील तरुण मंडळींनी सहभाग नोंदवला.
Users Today : 47