पाणी अडवा पाणी जिरवा मोहिमेअतर्गत तरुणांनी सहभागी व्हावे.
नरेंद्र राठोड तालुका कृषी अधिकारी
रितेश कुमार टीलावत तेल्हारा प्रतिनिधी
यावर्षी तेल्हारा तालुक्यात मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान झालेले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत ओढून आले यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाहते पाणी उपलब्ध आहे. पिकांना संरक्षित पाणी देण्याकरिता व पाण्याचे संधारण होऊन भूजल पातळीत वाढ होण्याच्या दृष्टीने कृषी विभागामार्फत वनराई बंधाऱ्याचे काम मोहिम स्वरूपात करण्यात येत आहे.त्याच अनुषंगाने तालुका कृषि अधिकारी श्री नरेंद्र राठोड व मंडळ कृषी अधिकारी श्री गौरव राऊत यांच्यासह सर्व हिवरखेड मंडळातील कृषि पर्यवेक्षक व कृषि सहाय्यक यांनी श्रमदानातून वनराई बंधाऱ्याचे काम पूर्ण केले.यामध्ये गावातील तरुण मंडळींनी सहभाग नोंदवला.
पिण्याच्या पाण्याप्रमाणे शेतीसाठी आपल्याला पाण्याची गरज आहे. पाण्यासाठी आपण कितीही विहिरी खोदल्या कितीही पाण्याचे पंप बसवले, तरी ते सर्व निरुपयोगी ठरणार आहे. कारण जमिनीखालील पाण्याची पातळी खाली खाली जात आहे. ही पातळी कशी वाढेल हे प्रथम पाहिले पाहिजे. यासाठी दोन योजना तातडीने हाती घेतल्या पाहिजेत . एक म्हणजे मोठ्या प्रमाणावर झाडाची लागवड करणे. झाडांची संख्या वाढली तर जमिनीखालील ती पातळी वाढण्यास मदत होईल.तसेच, ‘ पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही दुसरी योजना युद्धपातळीवर राबवायला हवी. यामुळे जमिनीखालील पाण्याची पातळी वाढेल असे मत तालुका कृषी अधिकारी नरेंद्र राठोड यांनी व्यक्त केले.पाणी अडवा पाणी जिरवा ही एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये आपण पावसाचे पाणी आवश्यक गोष्टींसाठी वापरू शकतो. ठराविक ठिकाणी पावसाचे पाणी साठवून आपण पाणी परत वापरू शकतो. असे अनेक मार्ग आहेत, ज्याच्या मदतीने आपण पावसाचे पाणी साठवू शकतो. या पद्धतींमध्ये, पाणी जमिनीत पोहोचण्यापूर्वी साठवणे आवश्यक आहे.पाणी आडवा पाणी जिरवा या म्हणीला साकार करू शकतो. साधारण जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये पाऊस पडतो. या चार महिन्यांमध्ये पडणारे पावसाचे पाणी आपणास वर्षभर वापरावे लागते. ज्या भागात पाऊस कमी पडतो तिकडे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होते.त्यामुळे भूजल पातळीत वाढ होण्याच्या दृष्टीने व पर्यायी शाश्वत व संरक्षित सिंचन उपलब्ध होण्याच्या दृष्टीने पाण्याचे संधारण गरजेचे आहे.
Users Today : 47