राजपूत/परदेशी समाज हा भटका समाज होता,त्यांची आर्थिक स्थिती अत्यंत दुर्बल व दयनीय आहे, या देशाच्या मातीशी एकनिष्ठ असणारा देशातील
हा समाज लढवैया समजला जातो,हा समाज या देशाचा मूळ रहिवाशी आहे ,त्यामुळे केंद्र सरकार व राज्य सरकारने या समाजातील मुलं-मुली शिकावे,त्यांनी प्रगती करावी,समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून या जातीचा समावेश “विमुक्त जाती”त केला आहे,मात्र अलीकडे राज्यातील काही असामाजिक विचारांच्या लोकांनी या समाजा विरूद्ध शासनाकडे तक्रार करून या समाजाला सवलती देऊ नये असा तगादा लावला आहे,त्यामुळे यासमाजाच्या
मुलां-मुलींचे शैक्षणिक नुकसान मोठया प्रमाणात होत आहे, काही विद्यार्थ्यांना शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ आलेली आहे,शासनाचे स्पष्ट आदेश असतानाही
या विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाण पत्र देण्यास संबंधित अधिकारी टाळाटाळ करीत आहे,जातीचे वैधता प्रमाण पत्र देण्यासही नको ते पुरावे मागून अधिकारी या विद्यार्थ्यांची अडवणूक करीत आहेत ,त्यामुळे घटनेचा मूलभूत हक्क देशातील प्रत्येक मुलां-मुलींनी शिकावे या पासून हे विद्यार्थी वंचित राहत आहेत,शासनाने, या तक्रारदारांच्या तक्रारी निकाली काढून राजपूत/परदेशी समाजाच्या विद्यार्थ्यांना शिक्षण व नौकरी पासून व शैक्षणिक सोयी -सुविधा पासून वंचित ठेऊ नये अशी अपेक्षा आहे,
धोंडीरामसिंह ध राजपूत,वैजापूर ,औरंगाबाद
मो,९४२१३१२२४४.
Users Today : 23