वृक्षांच्या कत्तलप्रकरणी सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

Khozmaster
1 Min Read
पाच आरोपी ताब्यात आलेगाव वन विभागाऐवजी चान्नी पोलिसांची कारवाई
मळसुर आलेगाव
वनपरिक्षेत्रांतर्गत वृक्षतोडीला उधाण आल्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये बुधवार, २३ नोव्हेंबर रोजी प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत आलेगाव वन विभागाऐवजी अखेर चान्नी पोलिसांनी बुधवारी चतारी सांगोळा रस्त्याला लागून वृक्षांची कत्तल करताना पाचजणांना ताब्यात घेतले.
रस्त्याला लागून शासनाने लागवड केलेल्या वृक्षांची कत्तल सुरू असल्याची माहिती मिळताच चान्नी पोलिस ठाण्याचे ठाणेदार योगेश आहे.
वाघमारे, उपनिरीक्षक गणेश महाजन, दत्ता हिंगणे, सुधाकर करवते, योगेश डाबेराव, हर्षल श्रीवास यांनी वृक्षतोड सुरू असलेल्या ठिकाणी धाड टाकली. यावेळी वृक्षांची कत्तल करून लाकडाची विक्री करणाऱ्या ठेकेदार, चार मजूर अशा पाचजणांना अटक केली. चान्नी पोलिसांनी जिल्हा परिषदेच्या संबंधित अभियंत्यांना पाचारण करून त्यांच्या फिर्यादीवरून झाडांची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यासह वृक्षतोड करणारे पाचजण अशा सहा आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, लाकडांचा ढीग जप्त केला
चतारी – सांगोळा रस्त्याला लागून वृक्षांची कत्तल करताना पाचजणांना रंगेहाथ पकडले, शेतकऱ्यानी कटाईसाठी झाडे विकल्याचे निदर्शनास आल्याने तसेच संबंधितांच्या फिर्यादीवरून शेतकन्यासह सहा आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
योगेश वाघमारे, ठाणेदार, पोलिस ठाणे, चान्नी
0 9 4 8 0 7
Users Today : 47
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *