वार्ता ..
अफवासोडली कुणी
गेला नेता अभिनेता
आग पसरली सर्वत्र
पहा पाहता पाहता
वेग घेऊनि वा-याचा
जोशात फिरते वार्ता
विचारु नकात सोर्स
कोण कर्ता करविता
बातमी सत्य असत्य
चौकशा कशा करता
चर्चेचे गुऱ्हाळ चाले
खुपचं चांगला होता
आठवण रंगू लागली
होता भेटलेलाआत्ता
कानोकानी पसरली
ज्ञातअज्ञात ती कथा
जाणतो का खरोखर
नातेवाईकांची व्यथा
उपदेश करतो कुणी
अनाकलनीयविधाता
जीवनअसे क्षणभंगुर
रंगे हरिदासाची गाथा
दिसेल ज्याला त्याला
घाले गाढवाच्यालाथा
रे अमूक गेलाचं नाही
नंतर कुठूनही कळता
हिरमुसले होऊन जरा
आतल्या आत जळता
– हेमंत मुसरीफ पुणे
9730306996..
Users Today : 9