भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत आमच्या उकळी केंद्रातील शिक्षक बंधू-भगिनी आणि विद्यार्थी यांनी विविध उपक्रम राबवून सदर अमृत महोत्सव आपल्या केंद्रपातळीवर यशस्वी केला.आपले शिक्षक बंधू-भगिनी आणि विद्यार्थी यांनी केलेल्या कार्याचा कुठेतरी गौरव व्हावा हा हेतू मनात ठेवून केंद्रांतर्गत प्रत्येक शाळेला व केंद्रांतर्गत शाळांतील सर्व शिक्षक बंधू-भगिनींना सन्मानपत्र देऊन त्यांच्या कार्याचा गुणगौरव करण्याची संकल्पना आमच्या उकळी केंद्राचे कर्तव्यदक्ष केंद्रप्रमुख श्री राजेंद्र वाघ साहेब यांनी व्यक्त केली.आणि त्यांच्या संकल्पनेतूनच आमच्या उकळी केंद्रातील सर्व शाळांचा तथा सर्व शिक्षक बंधू-भगिनींचा(वैयक्तिक) सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.मा.केंद्रप्रमुख साहेबांच्या ह्या विचारांना केंद्रीय शाळेचे कर्तव्यदक्ष उ.श्रे.मु.अ.श्री एन.जी.बाप्पू देशमुख सर यांनी बळकटी दिली तर वरवंड केंद्राचे कर्तव्यदक्ष केंद्रप्रमुख मा.श्री.डी.डी.धोटे साहेब यांनी संपूर्ण दिवसभर सोबत राहून केंद्रातील प्रत्येक शाळेचा आणि केंद्रांतर्गत शाळेतील प्रत्येक शिक्षकाचा गुणगौरव समारंभ संपन्न करण्यासाठी सहकार्य केले.आणि या संकल्पनेला मूर्त रुप देण्यासाठी राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त उपक्रमशील शिक्षक श्री जी.के.देशमुख सर यांनी मोलाचे सहकार्य केले.मला देखील सदर कार्यक्रमाचा एक भाग होण्याची संधी माननीय केंद्रप्रमुख वाघ साहेबांनी उपलब्ध करुन दिली.त्यांचे हार्दिक आभार
Users Today : 23