संविधान दिन ..
महामानवाने दिलेला
संविधानाचा वारसा
जपायचे जीवापाड
आपणावरती भरोसा
जाणून घेई संविधान
नको केवळकानोसा
वर्तणूक तशीचं हवी
विचार हवा जरासा
समृद्ध असे संस्कृती
संविधान हा आरसा
आपण आहोत कसे
पहावे भल्या माणसा
कर्तव्य काय आपले
कायद्याचा घ्या वसा
भेदा भेद दूर ठेवावा
समभाव ये नसानसा
भारतीयआहोत सारे
तडा नको रे विश्वासा
भिमरावाचीशिकवण
विश्वास या आश्वासा
– हेमंत मुसरीफ पुणे
९७३०३०६९९६
Users Today : 9