औरंगाबाद प्रतिनिधी गोकुलसिंग राजपूत
जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील गोपेवाडी येथील विवाहित महिलेना छेडछाडीला कंटाळून शेतातील चिंचाच्या झाडाला गळफास लाऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरात खळबळ माजली आहे. दरम्यान आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव पल्लवी रवींद्र झाडे वय २६ रा. गोपेवाडी ता.पैठण असे आहे.याबाबत माहिती अशी की पैठण तालुक्यातील गोपेवाडी येथे राहणाऱ्या पल्लवी रवींद्र झाडे या विवाहीतेने गावातीलच प्रशांत बाबासाहेब खराद वय ३० वर्षे याच्या छेडछाडीला कंटाळून शेतातील विहीरी जवळील चिंचेच्या झाडाला साडीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे तक्रार मयत पल्लवीचा पती रवींद्र झाडे यांनी पैठण पोलीस ठाण्यात दाखल केल्यामुळे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरक्षक किशोर पवार यांनी आरोपी प्रशांत खराद याच्या विरोधात कलम ३०६ व ३५४ नुसार गुन्हा दाखल केला असून. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, मयत पल्लवी हिच्यावर येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात करण्यात येऊन शुक्रवारी दि.२५ रोजी दुपारी पोलीस उपनिरीक्षक दशरथ बुरकूल, फौजदार संजय मदने, पोकाॅ भाऊसाहेब ठोकळ, बाबासाहेब शिंदे यांच्या बंदोबस्तात गोपेवाडी येथे अंतिमसंस्कार करण्यात आला पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दशरथ बुरकूल हे करीत आहे.
गोकुलसिंग राजपूत तालुका अध्यक्ष सोयगाव
Users Today : 18