एल. आर. टी. च्या एन. सी. सी. कैडेट्स तर्फे संविधान उद्देशिका वाचन 

Khozmaster
2 Min Read
 दि. बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी, अकोला द्वारा संचालित श्रीमती एल. आर. टी. वाणिज्य महाविद्यालय, अकोला येथील एन. सी. सी. युनिट तर्फे  संविधान का उद्देशिका वितरण व वाचन कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. जी. चापके यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन महाविद्यालयाचे एन. सी. सी. ऑफिसर कॅप्टन डॉ. अनिल तिरकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्राचार्य डॉ. एस. जी. चापके यांनी एन. सी. सी. कॅडेट्सला संविधान उद्देशिका वितरित करून त्याचे वाचन केले तसेच त्यांनी संविधान दिवसाचे महत्त्व समजून सांगितले. महाविद्यालयाचे एन. सी. सी. ऑफिसर कॅप्टन डॉ. अनिल तिरकर यांनी संविधान दिवस का साजरा केला जातो, संविधान कोणी लिहिले तसेच संविधान सभेचे प्रमुख कोण याविषयी कॅडेटला मार्गदर्शन केले. तसेच २६/११ या  दिवसाला मुंबई येथील ताज व ओबेरॉय हॉटेल वर झालेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम सुद्धा यावेळी घेण्यात आला. या कार्यक्रमाला दि. बी. जी. ई. सोसायटीचे अध्यक्ष ॲड. मोतीसिंहजी मोहता, वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. विजयकुमार तोष्णीवाल, कनिष्ठ उपाध्यक्ष श्री. रवींद्र जैन, मानद सचिव श्री. पवन माहेश्वरी, सहाय्यक सचिव इंजि. अभिजित परांजपे व समस्त माननीय कार्यकारी सदस्यांनी कॅडेट्सला शुभेच्छा देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढविला. या कार्यक्रमाचे आयोजन आणि कार्यक्रम यशस्वी बनवण्यासाठी सीनियर अंडर ऑफिसर रोहित डिगे, जूनियर अंडर ऑफिसर मिनल रेड्डी, जूनियर अंडर ऑफिसर श्याम ढोरे, सार्जंट जयश्री हरसुलकर, सार्जंट ऋषिकेश पटेल, कॉर्पोरल शिवानी अवातिरक, कॉर्पोरल ओम डांगे, कॉर्पोरल प्राजक्ता नारखेडे,  कॉर्पोरल वैष्णवी ढेंमरे, कॉर्पोरल कार्तिक लाडगे, कॉर्पोरल सागर वानखडे कॅडेट अवंतिका खंडार, कॅडेट पुर्वा देवघरे, कॅडेट रेशमा गालफाडे कॅडेट वैष्णवी पांडे, कॅडेट साक्षी ठाकरे, कॅडेट किरण माने, कॅडेट साक्षी गुप्ता, कॅडेट साक्षी पांडे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद व प्रशासकीय कर्मचारी या कार्यक्रमाला भरपूर प्रमाणात उपस्थित होते.
0 9 4 8 9 3
Users Today : 65
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *