सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
जामनेर तालुक्यातील पहूर येथील कसबे येथील जिल्हा परिषद कन्या शाळेच्या नवोपक्रमशील विद्यार्थी प्रिय शिक्षिका कीर्ती बाबुराव घोंगडे यांना यंदाचा जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार डायट प्राचार्य डॉ .अनिल झोपे यांच्या हस्ते आमदार सुधीर तांबे , आमदार शिरीष चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत जळगाव येथील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात मोठ्या थाटात प्रदान करण्यात आला .
कोरोना महामारीच्या कठीण काळात घराच्या गच्चीवर शाळा भरवत कीर्ती घोंगडे यांनी गोरगरीब विद्यार्थिनींचे शिक्षण अविरत सुरू ठेवले , त्यांच्या या कार्याची दखल जळगाव जिल्हा परिषदेने घेऊन त्यांना आज शिक्षक दिनी जळगाव येथे झालेल्या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले .सोहळ्यास पालकमंत्री ना .गुलाबराव पाटील , आ .राजू मामा भोळे , पोलीस अधीक्षक डॉ .प्रवीण मुंडे , जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ .पंकज आशिया , निवृत्त प्राचार्य डॉ .निळकंठ गायकवाड , प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कीर्ती घोंगडे यांना गौरविण्यात आले .
माजी पंचायत समिती सभापती बाबुराव घोंगडे , माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे , रामचंद्र वानखेडे ,मधुकर लहासे , लक्ष्मण गोरे , शंकर जाधव , राजू जाधव , केंद्रप्रमुख भानुदास तायडे , मुख्याध्यापिका वैशाली घोंगडे , शंकर भामेरे यांच्यासह जामनेर तालुक्यातून शिक्षक – शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते . कीर्ती घोंगडे यांच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे .