विभागीय प्रतिनिधी प्रमुख एजाज खान
नोव्हेंबर हा संविधान असल्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अतिशय”संविधान दिन” अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.के.जी.एन. शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पक्ष कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष मेहकर नगर परिषदेचे मा.नगराध्यक्ष कासम भाई गवळी हे होते.कार्यक्रमात सुरुवातीला संविधान दिना निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या प्रतिमेला कासम भाई गवळी यांनी हार अर्पण केले त्याच प्रमाणे सर्व उपस्थित मान्यवरांनी पुष्प अर्पण केले.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक मा. नगर सेवक तथा सभापती सुरेश मानवतकर यांनी केले त्याचप्रमाणे बाळासाहेब ससाणे,अडवोकेट किशोक्ष धोंडगे,भीमशक्तीचे विदर्भ सरचिटणीस किशोर दादा गवई,सुमित धोटे यांनी ही संविधान दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला.संविधान दिना निमित्त आपल्या अध्यक्षीय भाषणात आपले मनोगत व्यक्त करताना कासम भाई गवळी म्हणाले की डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिल्यामुळे आज आपणाला तसेच सर्वसामान्य माणसाला स्वातंत्र्याने जगणाचा अधिकार मिळाला भारत देशात संविधाना पेक्षा कोणतीही व्यक्ती मोठी नाही.संविधानामुळे आपल्याला स्वातंत्र्याचा,मतदानाचा ,देशात कोठेही वास्तव्य करण्याचा ,देशात कोठेही व्यापार करण्याचा मुलभूत अधिकार मिळालेला आहे.परंतु आज केंद्रातील भाजप सरकार सर्वसामान्याचे सर्व अधिकार हिसकून घेण्याचे कटकारस्थान करू पाहत आहे यासाठी ते संविधान बदलू पाहत आहे परंतु आम्ही यांचे हे षडयंत्र हानुन पडू असे म्हटले.या कार्यक्रमात 26/11 च्या भ्याड हल्ल्यात शहिद झालेल्याना आदरांजली वाहण्यात आली.या वेळेस या कार्यक्रमाला काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, ज्येष्ठ नेते तसेच कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे सूत्र संचालन गजेंद्र माने सर यांनी तर आभार प्रदर्शन संजय ढाकरके यांनी केले.
Users Today : 23