बुलडाणा, दि 7 : शासकीय कार्यालयात येणाऱ्या महिलांच्या स.मस्या जाणून घेऊन त्यांचे प्रश्न सोडविल्यास एक स्नेहाचे वातावरण तयार होण्यास मदत होईल. यासाठी प्रत्येक कार्यालयात महिला व बालस्नेही कक्ष तयार करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांनी केले.
जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी कार्यालय, तसेच कृषी समृद्धी मल्टीपर्पज फाउंडेशनच्या सखी वनस्टॉप सेंटर येथे महिला आणि बालस्नेही कक्षाचे उद्घाटन दिनांक मंगळवारी, दि. ६ सप्टेंबर रोजी करण्यात आले.
जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती म्हणाले, महिला आणि मुलांसोबत स्नेही आणि मैत्रीपूर्ण वातावरणात त्यांच्या समस्या चांगल्या पद्धतीने सोडविता येतील. मुलांसोबत खेळून बोलके करून त्यांच्या मनातील प्रश्न जाणून घेता येईल. कार्यालय महिला व बालस्नेही करताना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही बालस्नेही व्हावे. बालकल्याण समितीचे अध्यक्ष डॉ. मनोज डांगे यांनी बालकांचे उद्याचे भविष्य पाहताना तो आज सुरक्षित राहण्याला महत्व आहे. बालके सुरक्षित राहिली तरच उद्याचे भविष्य उज्ज्व ल आहे. बालकांवर होणारे अन्याय, अत्याचार जवळच्या व्यक्तीपासून होते. त्यामुळे बालकांना गुड टच आणि बॅड टचबाबत पालकांनी माहिती द्यावी असे सांगितले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी महिला व बालकांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना मनोसामाजिक प्रशिक्षण दिल्यास चांगले काम होण्यास मदत होईल, असे सांगितले. कार्यक्रमाला न्यायमूर्ती एच. एच. भुरे, अशोक मारवाडी, रामेश्वर वसू, दिवेश मराठे, वैशाली सोमनाथे यांनी मार्गदर्शन केले.यावेळी डॉ. प्रा. इंदुमती लहाने, प्रा. शाहिना पठाण, स्नेहल चौधरी, रीना कोराडे, डॉ. गायत्री सावजी, विष्णू आव्हाळे, ॲड. वर्षा पालकर, ॲड. अनुराधा वावगे, दिलीप कंकाळ, सावजी शिरसाट, सुधाकर शिरसाट, सोनाली भुतेकर, गणेश इंगळे, आशा बोर्डे, संगिता मोहिते, श्वेता जाधव, पौर्णिमा इंगळे, ॲड. अंजना घोंगडे, छाया अवचार, आरती गायकवाड, आरती इंगळे, ज्योती आढावे, उमेश निकाळे, अभिजीत कांबळे, ओम निकाळे, आत्माराम चव्हाण उपस्थित होते. कृषी समृद्धी मल्टीपर्पज फाउंडेशनचे अध्यक्ष महेंद्र सोभागे यांनी प्रास्ताविक आहे.