ऑटोचालकांना दिले नियमांचे धडे

Khozmaster
2 Min Read
अकोला
रस्त्याच्या मध्येच ऑटोरिक्षा उभा करून आरडोओरड करीत प्रवाशी बसविणाऱ्या ऑटो चालकांमुळे शहरातील वाहतुकीचा खोळंबा होतो. वाहतुकीची शिस्त बिघडते. त्यामुळे अशा ऑटो चालकांना समज दिला जातो, किंवा दंड आकारून सोडून दिले जाते. त्यातून वाहतुकीला शिस्त लागत नसल्याने उपविभागीय पोलिस अधिकारी आणि शहर वाहतूक शाखेतर्फे ऑटो चालकांना नियमांचे धडे देण्यात आले.शहरातील वाहतूक सुविधा सुचारू तसेच सुरळीत राहावी याकरिता उपविभागीय पोलिस अधिकारी सुभाष दुधगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत अकोला शहरातील ऑटो चालकांची बैठक जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा कार्यालयात घेण्यात आली. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी सुभाष दुधगावकर यांनी अकोला शहरातील ऑटो चालकांना नियमांचे तंतोतंत पालन करीत शहरात ऑटो चालवावे तसेच ऑटो चालवताना गणवेश, बॅच बिल्ला याचा वापर करावा याबाबत मार्गदर्शन केले.यासोबत शहरात ऑटो चालविताना सर्वसामान्य नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये याकरिता काळजी घ्यावी तसेच शहरातील प्रमुख चौकातील सिग्नलच्या नियमांचे पालन करावे, नियमानुसार ऑटो हा दिलेल्या पार्किंगच्या ठिकाणीच उभा करावा, ऑटो चालकांनि ऑटो चालविताना वाहना संदर्भात संपूर्ण कागदपत्र सोबत ठेवावे अशा सूचना उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी ऑटो चालकांना दिल्या. यावेळी शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस निरीक्षक विलास पाटील, पोलिस उपनिरीक्षक सुरेश वाघ यांच्यासह शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे कर्मचारी तसेच अकोला शहरातील २०० ऑटो चालक- मालक उपस्थित होते.
या नियमांचे करा पालन
पोलिस निरीक्षक विलास पाटील यांनी ऑटो चालक-मालकांना नियमांचे पालन करण्याबाबत माहिती दिली. खाकी गणवेश परिधान करावा, बॅच बिल्ला त्यावर लावावा, ऑटो चालविण्याचा परवाना, मूळ कागदपत्रे सोबत ठेवावी, अवैध प्रवासी वाहतूक करू नये, ऑटोच्या इंधनात भेसळ करू नये, सीएनजी गॅस भरताना अधिकृत डीलर कडूनचं भरावा, ग्राहकांकडून जास्त प्रवासी भाडे वसूल करू नये, दिलेल्या पार्किंग स्थळीच ऑटो पार्क करावेत, प्रवासी घेणे करिता बस स्थानक, रेल्वे स्टेशनमध्ये जावून आरडाओरड करू नये, ऑटोमध्ये काही वस्तू राहिल्यास पोलिसांकडे जमा करावी, संशयित व्यक्ती, वस्तू घटनांबद्दल पोलिसांना माहिती द्यावी याबाबत मार्गदर्शन केले.
0 9 4 8 9 3
Users Today : 65
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *