भारत मुक्ती मोर्चा च्या वतीने माटरगांव बु; येथे संविधान गौरव दिवस मोठ्या ऊत्सहात  साजरा

Khozmaster
2 Min Read
 – प्रतिनिधि रवि मगर-
भारत मुक्ती मोर्चा च्या वतीने माटरगांव बु; येथे संविधान गौरव दिवस मोठ्या ऊत्सहात  साजरा करण्यात आला  या कार्यक्रमाची सुरवात संविधानाची प्रास्ताविकता वाचन करून झाली. कार्यक्रमाचे ऊद्घाटक:  धिरज आर. बांडे (सहाय्यक पोलिस निरिक्षक जलंब) हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून मधुकर गव्हांदे (राज्य अध्यक्ष बुध्दीष्ट इंटरनेशनल नेटवर्क , राहुल इंगळे बामसेफ राज्य महासचीव, अँड.संदेश वानखडे , संध्या गवई ( राष्ट्रिय मुलनिवासी महिला संघ विदर्भ प्रभारी यांनी केले तर अध्यक्षता मा. प्रतिभा ऊबाळे  (भारत मुक्ती मोर्चा राज्य अध्यक्षा) यांनी संविधानावर सखोल मार्गदर्शन करत असतांना सांगितले कि देशात संविधान असतांना सुध्दा देशात प्रजेची सत्ता नाही व प्रजेला बहुजन समाजाला स्वतंत्र भारतात आजही सुध्दा बेरोजगारी , भखमरी , अन्याय अत्याचाराचा सामना करावा लागत आहे याला एकमेव कारण म्हणजे संसद मध्ये बसलेले सांसद , विधायक , EVM च्या माध्यमातून निवडून जात आहेत यास कॉग्रेस, बिजेपी जबाबदार आहे RSS संघटना हि विदेशी ब्राम्हणांची संघटना आहे ती बिजेपी व कॉग्रेसला नियंत्रीत करते, यामुळे देशात संविधान असतांना सुध्दा बहुजन समाज स्वतंत्र भारतात गुलाम आहे.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करूणानंद तायडे तर सुत्रसंचालन विजय इंगळे यांनी केले. या कार्यक्रमास विषेश अतिथी श्रीकांत तायडे सरपंच माटरगांव, सागर मोरे, विलास ससाने,प्रसेनजित खंडेराव सरपंच नारखेड, अमोल देशमुख, दिनेश तांबटकार , आनंद वाकोडे, हरेश घनबहादूर, नानाभाऊ खंडेराव, शेख साबिर, मनोरमा वाकोडे, शोभा तायडे, योगेश पानझडे,  शेख अयाज,प्रकाश धुदळे ( AIPS) तेजराव वाकोडे, प्रमिला तायडे ,संगिता  मोहोड, संतोष शिंदे, विकास सोळंके, सुर्यभान उंबरकर, विनोद पवार,  हे ऊपस्थीत होते.
0 9 3 7 4 2
Users Today : 23
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *