रितेश कुमार टीलावत तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा तालुक्यातील शेतकरी व सर्व जनतेसाठी सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी महत्वपूर्ण असलेल्या वान प्रकल्प हनुमान सागर धरण संदर्भातील समस्या सोडवण्याची मागणी तेल्हारा येथील पत्रकार सत्यशील सावरकर यांनी केली आहे.
वारी हनुमान सागर धरण संदर्भातील विविध मागण्या संदर्भातील समस्या बाबतीत विविध उपाययोजना आवश्यक आहेत त्यामध्ये वान प्रकल्पची ज्या सिंचनाच्या उद्देशाने धरण निर्मीती केली त्यासाठी सर्व प्रथम लाभधारक शेतकऱ्यांची जास्तीत जास्त शेती सिंचनाखाली येण्यासाठी प्रयत्न करणे,सिंचना बरोबरच अकोट-तेल्हारा उपविभागातील 159 खेडी पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करण्यासाठी उपाययोजना करावी,वान प्रकल्प लाभधारक तेल्हारा व संग्रामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे सिंचनासाठी केलेल्या पाटचरिचे दुरूस्ती करून प्रत्येक पाटचरीचे पाणी टेल पर्यंत जावून सिंचन क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न करणे,वान प्रकल्प पाणी वापर संस्थांचे पूर्नरगठण जून्या नव्या शेतकऱ्यांना घेऊन नियोजन करणे,वान प्रकल्प कार्यालयात कर्मचारी संख्या एकदमच कमी आहे ती पूर्ण करावी,शेतकऱ्यांनी स्वंयमस्फूर्तीने सिंचनासाठी पाईप लाईन व्दारे सिंचन व्हावे यासाठी केलेल्या आराखड्याला शासन मंजुरी देण्यात यावी,वान प्रकल्प व्दारे टाकण्यात आलेल्या पाटचरीमुळे शेतकऱ्यांची शेती गेली त्यामुळे शेती सिंचन व पिण्याचे पाणी या भागातील शेतकऱ्यांनाच आरक्षित करावे इतरत्र पळवू नये, वान हनुमान सागर धरण निर्मीती पासून धरणातील गाळ काढला नाही गाळ काढल्याने पाणी संचय क्षमता वाढण्यास मदत होईल,वान धरणाच्या पाण्यावर सुरू असलेल्या विद्युत निर्मिती प्रकल्पाची विज निर्मिती वाढवून तालुक्यातील शेती पंपांना दिवसा पुरवठा द्यावा,पाटचरीने ज्या भागात सिंचनासाठी पाणी पोहोचले नाही अशा शेत शिवारात मध्ये करण्यात आलेल्या कूंपनलीका सुरू करावे,धरणा लगतचे आदिवासी व इतर शेत शिवारात सिंचनासाठी वान प्रकल्प पाणी मिळत नाही त्यासाठी नियोजन करावे,सातपुडा पर्वत रांगांच्या कुशीत असलेल्या वान प्रकल्प हनुमान सागर परिसरात पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यात यावा अशा मागण्या पत्रकार सत्यशील सावरकर यांनी केल्या आहेत.
Users Today : 65