भविष्य ..
राजकीय घडामोडी
बदल घडतात वेगा
भविष्यकार तेजीत
दुकानां समोर रांगा
हरणारं असले तरी
जिंकालं असे सांगा
आंब्याच्या झाडाला
येई शेवगाच्या शेंगा
नका बोलू विपरीत
पाॅझिटीव्ह ते सांगा
गोड ऐकायला बरे
ज्योतिष धंदा चांगा
अपायावरती उपाय
सुचवा काही तोडगा
दणकून घ्या दक्षिणा
मस्त बिदागी मागा
खेळ असे भावनेचा
हीचं कमवाया जागा
ते लुटतात कित्येकां
दाखव त्यांची जागा
ते फसवती स्वताला
मनाला पडती भेगा
दुष्कृत्ये करी अनेक
पाहे हातावरचे रेघा
भगवतगिता सांगतो
खायला आले वाघा
दूध देतायं प्यायला
डसत्या विषारीनागा
हवा आहे मुबलक
कितीफुगवाल फुगा
दगडअसून दणकट
होऊन जाईलं भुगा
दिव्यशास्त्र ज्योतिष
अवस्था त्याची बघा
बरसाव्या रे धारांनो
आवाहन काळे ढगा
– हेमंत मुसरीफ पुणे
9730306996
Users Today : 9