प्रतिनिधी रामेश्वर वाढी पातूर
बोर्डी नदीपात्रात प्रसिद्ध असलेल्या गिन्नी खदान लगत असलेल्या शेतातील धुऱ्यावर एक इसम झाडाला गळफास घेऊन लटकत असल्याचे आज स्थानिक शेतकऱ्यांच्या निदर्शनास आल्याने परिसरात खळबळ उडाली होती.वाजताच्या दरम्यान बोर्डी नदीपात्रातील गिन्नी खदान लगत असलेल्या हाजी सै.रसूल यांच्या शेतातील धुऱ्यावर निंबाच्या झाडाला एका इसमाने गळफास घेतल्याचे तेथील शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले असता घटनेची माहीती त्यांनी पातूर पोलिसांना दिली.सदर माहितीवरून पातूर पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक हर्षु रत्नपारखी, पो.हे.कॉ.दिलीप इंगळे,सत्यजित ठाकूर यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा करून प्राथमिक तपास केला असता मृतकाचे नाव सै. सलीम सै. हातम (वय 55) रा. मुजावर पुरा,पातूर येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले.दरम्यान पातूर पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने मृतदेह शेतातून बाहेर आणून उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रूग्णालय अकोला येथे पाठविला असून पुढील तपास पातूर पोलिस करीत आहेत.
Users Today : 51