प्रतिनिधी रामेश्वर वाढी
राज्यस्तरावर घेण्यात येणाऱ्या अबॅकस च्या स्पर्धेमध्ये राज्यस्तरावर उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या तसेच चॅम्पियनशिप विद्यार्थी विद्यार्थिनींचा सत्कार पातुर येथील रामानुजन जी चॅम्स क्लासच्या वतीने करण्यात आला आहे.27 नोव्हेंबर रोजी माऊली नगर येथे या क्लासच्या वतीने या विद्यार्थ्यांच्या भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री मनोहर उगले उपाध्यक्ष प्रियदर्शनी ग्रामीण आदिवासी फाउंडेशन नवेगाव तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष देवानंद गहिले ,अमरावती बोर्ड मेंबर माजी सदस्य पत्रकार प्राध्यापकसि. पी. शेकूवाले, अंकुर साहित्य संघाचे पातुर तालुका कार्याध्यक्ष प्राध्यापक विजय अत्तरकार यांची यावेळी मंचावर उपस्थिती होती.सर्वप्रथम हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून हार अर्पण केले.त्यानंतर राज्यस्तरावर चॅम्पियनशिप मिळवणाऱ्या सुपरस्टार निलय सुनील घोरे तसेच रँक घेणाऱ्या रोहित सागर उपरवट ,समर विलास काळपांडे तसेच शौर्य सम्राट हिवराळे आणि चॅम्पियनशिप मिळवणाऱ्या आराध्या नंदकिशोर राऊत, सानवी संतोष चिकटे, तनुजा प्रशांत बदरके ,तनिष्का अनिल दळवी, आदित्य निलेश आयसकार, आणि अनुराग विकास जाधव, तनिष्का अनिल दळवी, शौर्य सम्राट हिवराळे, अंगद विनोद गोमासे, पियुष श्रीकांत शिंदे, सानवी संतोष चिकटे, आराध्या नंदकिशोर राऊत, निलय सुनील गोरे, आदित्य निलेश आयस्कर, प्रज्योत विजय वाठोरे, साहिल सागर उपरवट, रोहित सागर उपर्वट, ऋषी सुधाकर अटाईकर, तनुजा प्रशांत बदरके, गुरुनाथ बजरंग भुजबळ, अस्मिता श्रीधर कराळे, अर्णव प्रसिक गुडधे, ओम ज्ञानेश्वर गोमासे या विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला आहे.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक विजय अत्तरकार यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विलास मोहन काळपांडे यांनी केले आणि या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रामानुजन अबॅकस पातूर शाखेच्या सौ. मिताली काळपांडे मॅडम यांनी केले .या कार्यक्रमाप्रसंगी मनोहर उगले, देवानंद गहिले प्राध्यापक विजय अत्तर कार यांनी यावेळी मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांचा पाया हा बाल वयातच यशस्वी होतो त्यामुळे स्पर्धेमध्ये यश मिळवायचे असेल तर लहानपणापासूनच संस्काराची जोड द्यावी लागते त्यामुळे इंग्रजी व गणित विषयावर अधिक लक्ष देणे गरजेचे असल्याचे विचार यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोहर उगले यांनी व्यक्त केले आहेत
या कार्यक्रमाकरिता पालक वर्ग विद्यार्थी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
Users Today : 39