सचिन ढोणे यांच्या वाढदिवसानिमित्त गरजूना ब्लॅंकेटचे वाटप  भारतीय जनता पार्टीचा एक स्तुत्य उपक्रम

Khozmaster
1 Min Read

प्रतिनिधी रामेश्वर वाढी

पातूर :- कडाक्याच्या थंडीचा पारा वाढत असताना बाजारांमध्ये स्वेटर ब्लॅंकेटची दुकाने सजली प्रत्येक जण आपापल्या परीने थंडीपासून रक्षण व्हावे यासाठी स्वेटर आणि ब्लॅंकेटच्या खरेदीची लगबग करीत आहे. आपला थंडीपासून बचाव कसा होईल याचा प्रयत्न करीत आहे परंतु गल्लीपासून दिल्लीपर्यंत गरीब-श्रीमंत दरी अजून वाढतच चालली आहे वाढत्या बेरोजगारीमुळे गरीब गरीब होत चालला तर श्रीमंत आपल्या जीवनशैलीला परिस्थितीनुसार बदलण्याचा प्रयत्न करीत आहे.

परंतु या महागाईच्या जमान्यात गरिबांना अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा भागवणे ही मोठे कठीण होत चालले आहे. अशा कठीण परिस्थितीत जगणाऱ्या गरजू लोकांचा थंडीपासून बचाव करण्यासाठी भाजप कार्यकर्ते सचिन ढाणे यांच्या वाढदिवसानिमित्त पातुर तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांनी पातुर शहर व बाजूच्या निराधार गरजू लोकांचा शोध घेऊन त्यांच्या घर, झोपडी पर्यंत पोहोचून जवळपास 150 ब्लॅंकेट चे वाटप केले व त्यांची सहानुभूतीपूर्वक विचारपूस करून त्यांच्या अडीअडचणीत कायम भाजपा त्यांच्या सोबत राहील असे आश्वासन दिले. यावेळी पातुर शहरातील सर्व ज्येष्ठ भाजपा कार्यकर्ते या स्तुत्य उपक्रमाला उपस्थित होते. वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून गोरगरीब जनतेला मदत करणे हाच संदेश सचिन ढोणे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त जनतेला दिला.

0 9 4 7 5 0
Users Today : 39
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *