विष प्राशन करून २५ वर्षीय तरुणांची आत्महत्य
योगेश नागोलकार राहेर
एका २५ वर्षीय तरूणाने शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली आहे.ही घटना २९ नोव्हेंबर रोजी ८ वाजेच्या सुमारास पातुर तालुक्यातील राहेर येथे घडली.आकाश या तरूणाने शेतात विषारी द्रव औषध सेवन केले.हा प्रकार लक्षात येताच त्याला मळसूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता डॉक्टरांनी तात्पुरता उपचार करून १०८ रुग्ण वाहनाला पाचरण करून मळसूर येथून डॉक्टरांनी अकोला येथे हलविण्यात आले मात्र आकाशचा रस्त्यानेच मृत्यू झाला होता. आकाश तुळशिराम पवार वय अंदाजे 25 वर्षीय असे आत्महत्या केलेल्या तरुणांचे नाव आहे.तसेच त्याची उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दीला. मात्र या आत्महत्ये मागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान या घटनेमुळे सर्वत्र परिसरात एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.मयत युवकाचे लग्न होयल असून त्याच्या पश्वात पत्नी ४ महीन्याचा मुलगा व १ वर्षाची मुलगी असा परिवार असून मुले बापावीना झाले आहेत.घटनेची माहीती पोलीस स्टेशनला कानोकान ही नाही काय पडली अशी चर्चा नागरिकांन कडून बोलण्यात आली आहे.
Users Today : 39