रितेश कुमार टीलावत तेल्हारा प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा यांचे संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायाला चालना देण्यासाठी व त्यातून शाश्वत उत्पन्नाचा सोर्स मिळवून देण्याच्या उद्देशाने प्रकल्प संचालक आत्मा श्री आरिफ शहा व तालुका कृषि अधिकारी तेल्हारा श्री नरेंद्र राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे दानापूर तालुका तेल्हारा जिल्हा अकोला येथे विष्णू शंकराव घायल यांच्या शेतात मधुमक्षिका पालन या विषयावर शेतकरी प्रशिक्षणाच्या आयोजित करण्यात आले होते.या प्रशिक्षणाला श्री बिलबिले तांत्रिक सहाय्यक जिल्हा खादी ग्रामोद्योग मंडळ अकोला यांनी मध माशींच्या प्रजाती मध्यांच्या कोळ्यांची स्थापना मधमाशांच्या वसाहतीचे व्यवस्थापन मधमाशीचे पालनाचे फायदे मधमाशांचे प्रकार मधाचे फायदे मधमाशांचे खाद्य इत्यादी विषयावर सखोल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक मोगरे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा तर आभार प्रदर्शन एम एस इंगळे कृषी सहाय्यक यांनी केले सदर प्रशिक्षणाला विष्णू घायाळ सुरेश कुराडे विवेक आगे रामेश्वर कैलास रंधवे श्रीकृष्ण योगेश पालीवाल श्री ढगे व गावातील शेतकरी उपस्थित होते.
Users Today : 39