नागनाथजी ..
नागनाथ कोत्तापल्ले
छात्र प्रिय प्राध्यापक
शास्त्रशुध्द मराठीला
दिधली दृष्टी व्यापक
घडवले श्रेष्ठ विद्यार्थी
नजर असे गुणग्राहक
स्वतः जणूं विद्यापीठ
ज्ञान शलाका वाहक
विकास करी विश्वासे
शिस्तबद्ध ते शासक
बहुआयामी व्यक्तित्त्व
कुलपती तेआश्वासक
काव्य कथा कादंबरी
संपदा सर्वसमावेशक
संपादन टिकासमिक्षा
साहित्यप्रेमी उपासक
साहित्यसंमेलनाध्यक्ष
धुरा वाहिली समर्थक
घर जणूं वाचनालय
आयुष्य केले सार्थक
चिरकाल साथ देतीलं
विचार आपले मोहक
श्रध्दांजली वाहताना
तरीही हृदयात दाहक
– हेमंत मुसरीफ पुणे .
9730306996
Users Today : 9