रितेश कुमार टीलावत तेल्हारा प्रतिनिधी
तालुका कृषी अधिकारी कार्यालय व तालुका कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत दिनांक सौंदाळा येथे तालुका कृषि अधिकारी श्री नरेंद्र राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी श्री सुरेंद्र रामभाऊ राहणे यांचे शेतात संत्रा पिक व्यवस्थापन या विषयावर आधारित शेतीशाळा वर्ग आयोजित करण्यात आली होती. सदर शेती शाळेमध्ये कृषि सहाय्यक श्री एम व्ही सारभूकन यांनी संत्रा पिकातील एकात्मिक अन्नद्रव्य खते व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, तन नियंत्रण, एकात्मिक किड रोग नियंत्रण इत्यादी विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले .तसेच तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री मोगरे यांनी शेतकरी गट महत्त्व , गरज व स्थापना बाबत मार्गदर्शन केले तसेच शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करणे , प्रधानमंत्री सुषमा अन्नप्रक्रिया उद्योग योजना या विषयावर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री ओ के मोहोड कृषी सहाय्यक तर आभार प्रदर्शन महेश इंगळे कृषी सहाय्यक यांनी केले. सदर शेती शाळेला डी जी नागे कृषी पर्यवेक्षक श्री सुरेंद्र रामभाऊ राहणे प्रगतशील शेतकरी योगेश राहणे शंकरराव फुंडकर सारंगधर मेतकर राम शाम शेवाळे अशोक कोकाटे दीपक गोतमारे व गावातील सर्व इतर संत्रा उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
Users Today : 39