मराठी पत्रकार परिषद वर्धापन दिना निमित्त 3 डिंसेबरला ग्रामीण रूग्णालय तेल्हारा मध्ये पत्रकार आरोग्य तपासणी शिबिर.

Khozmaster
2 Min Read
रितेश कुमार टीलावत तेल्हारा प्रतिनिधी
मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिना निमित्त 3 डिसेंबर रोजी ग्रामीण रूग्णालय तेल्हारा येथे तालुक्यातील पत्रकारां साठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरात जास्तीत जास्त पत्रकार,वितरक यांनी आपली आरोग्य तपासणी करावी असे आवाहन तेल्हारा तालुका पत्रकार संघाचे  वतीने करण्यात आले आहे.
 मराठी पत्रकार परिषदेच्या 83 व्या वर्धापन दिना निमित्त राज्यभरात पत्रकारांच्या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्याचे आवाहन परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी राज्यभरातील पत्रकार व विविध संस्थांना केले आहे. या आवाहणाला प्रतिसाद देत तेल्हारा तालुक्यात सुद्धा परिषदेचे माजी अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा, जिल्हा पत्रकार संघ अध्यक्ष शौकतअली मिरसाहेब, सरचिटणीस प्रमोद लाजुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी पत्रकार परिषद संलग्न अकोला जिल्हा पत्रकार संघ शाखा तेल्हारा तालुका पत्रकार संघाचे वतीने ग्रामीण रूग्णालय तेल्हारा या ठिकाणी 3 डिसेंबर रोजी शनिवारी पञकाराचे आरोग्य तपासणी शिबीर आयोजन करण्यात आले असून हे शिबिर सकाळी 9 ते दुपारी 2 या कालावधीत संपन्न होणार आहे. या शिबिरात तज्ञ डॉक्टर मंडळी पत्रकारांची तपासणी करणारा असून प्रामुख्याने डॉ. पेदाम, डॉ. मल्ल, डॉ खोडके, डॉ. कर्दळे मॅडम, डॉ. सदाफळे, डॉ.सौ. सदाफळे, डॉ. इंगळे, डॉ.चौधरी, डॉ.करोडे, निखिल वरेकर,कोकाटे,नन्ने, आदी तज्ञ डॉक्टर मंडळी पत्रकारांची तपासणी करणारा असून या तपासणी शिबिराचा लाभ तेल्हारा तालुक्यातील जास्तीत जास्त पत्रकार,वितरक यांनी घ्यावा असे आवाहन तेल्हारा तालुका पत्रकार संघाचे वतीने करण्यात आले आहे.
0 9 4 7 5 0
Users Today : 39
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *