समतापर्वांतर्गत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे आणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन

Khozmaster
1 Min Read
 अकोला
येथील मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतीगृहात समतापर्वांतर्गत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे आणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.राज्यात २६ नोव्हेंबर हा ‘संविधान दिन’ आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘महापरीनिर्वाणदिन’ ६ डिसेंबर या कालावधीत ‘समता पर्व’ साजरे होत आहे. याचाच एक भाग म्हणून  सामाजिक न्याय विभागांतर्गत कार्यरत येथील मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतीगृहात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत अनंतकुमार सरकडे यांनी स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक अभ्यास सोप्या पध्दती, विविध क्लृप्त्यांचा आवश्यक असलेला अवलंब आदिंबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.वसतीगृहाचे गृहपाल डि. बि. बोथिंगे यांनीही  यावेळी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेविषयी मार्गदर्शन केले. समतापर्वांतर्गंत चित्रकला स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले. यात वसतीगृहातील मुलांनी मोठया प्रमाणात  सहभाग घेतला. या स्पर्धेत इयत्ता ९ वीचा विद्यार्थी प्रज्वल वासुदेव देवकर याने प्रथम क्रमांक पटकाविला.मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतीगृहात चित्रकला स्पर्धेचे आयोजन मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतीगृहात समतापर्वांतर्गत चित्रकला स्पर्धेचे आणि व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. बुधवारी दि.३० नोव्हेंबर रोजी वसतीगृहात ‘चित्रकला स्पर्धा’ आयोजित करण्यात आली. वसतीगृहातील मुलींनी  या स्पर्धेत मोठया संख्येने  सहभाग घेतला. या स्पर्धेत आकांक्षा भगवान वानखेडे हीने प्रथम क्रमांक मिळविला. ‘संविधान व महिला सबलीकरण’ विषयावर गजानन खाडे यांचे व्याख्यानही आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानास वसतीगृहातील विद्यार्थीनी व अधिकारी -कर्मचारी उपस्थित होते.
0 9 4 7 5 0
Users Today : 39
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *