खोजमास्टर ग्रुप ऑफ मिडिया महाराष्ट्र
पिंपरी : मराठवाडा मुक्तीसंग्राम भारतीय स्वातंत्र्याच्या पूर्णत्वाचा अमृत महोत्सव वर्षा निमित्तदेशभक्तीच स्फुल्लींग … मनामनात पेटवणारी …
जन्मभुमि कर्मभुमिची नाळ घट्ट करणारी…स्वामी रामानंद तीर्थ जन्मस्थळ ते समाधीस्थळ’ पवित्र माती मंगल कलश संवाद यात्रा ‘सिंदगी विजापुर ते मराठवाडा ते हैदराबाद तेलंगणा कर्नाटक – महाराष्ट्र- तेलंगणा
दि. १२ जानेवारी दि. २३ जानेवारी २०२३
राष्ट्रमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद जंयती ते नेताजी सुभाषचंद्र बोस जंयती या अनुषंगाने आपल्या पिंपरी चिंचवड व पुणे महानगरात वास्तवे करणाऱ्या मराठवाडा भुमिपुत्रांची मिटींग गुरुवार दि. १ डिंसेबर २०२२ रोजी सायंकाळी ५. ३० वाजता मराठवाडा जनविकास संघ कार्यालय, पिंपळे गुरव पिंपरी चिंचवड पुणे ६१ येथे आयोजीत करण्यात आली होती

मराठवाडा जनविकास संघ व मराठवाडा भुमिपुत्र पिंपरी चिंचवड शहर जिल्हा पुणे यांच्या संयुक्त विद्यामान मराठवाडा मुक्तीसंग्राम भारतीय स्वातंत्र्याच्या पुर्णत्वाचा अमृत वर्ष २०२२- २०२३ निमित्त गौरवशाली मराठवाड्याच्या मातीसाठी…
मराठवाडा मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक,हुतात्म्यांना मानवंदना देण्यासाठी…
मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी…
जन्मभुमि कर्मभुमिची नाळ घट्ट करण्यासाठी.. गल्ली ते नवी दिल्ली देशभक्तीचे स्फुल्लींग… मनामनात पेटवणारी.. स्वामी रामानंद तीर्थ जन्मस्थळ ते समाधीस्थळ ‘ पवित्र माती मंगल कलश संवाद यात्रा ‘ यशस्वी आयोजनासाठी विचार मंथन अन् नियोजनावर सर्व दृष्टीकोनातुन चर्चा झाली . प्रत्येकाने आपले विचार मनमोकळे पणाने व्यक्त केले आणि सर्वानुमते एक ठराव मंजुर करण्यात आला कि राष्ट्रमाता जिजाऊ,स्वामी विवेकानंद जंयती ते नेताजी सुभाषचंद्र बोस जंयती म्हणजे दि. १२ जानेवारी ते दि. २३ जानेवारी २०२३ यशस्वी आयोजन करण्यात येणार. या बैठकीसाठी मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार, मार्गदर्शक दिलीप देशमुख बारडकर,सुर्यकांत कुरुलकर, डॉ. प्रिती काळे मराठवाडा भुमिपुत्र नितीन चिलवंत,जीवन बोराडे, मुंजाजी भोजने,प्रल्हाद लिपने,शंकर तांबे, आण्णासाहेब मोरे, प्रा. डॉ. प्रविण घटे व राजपुत समाज संघटना अध्यक्ष शिवकुमारसिंह बैस यांची उपस्थिती होती.

मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा ज्वाजल्य देशभक्तीचा सशस्त्र लढयाचा इतिहास हा मराठवाड्या पुर्त मर्यादीत न राहता तो संपुर्ण भारत देशात माहिती व्हावा या दृष्टीकोनातुन तन मन धन लावुन काम करण्याच सर्वांनी एक मताने ठरविले कार्यक्रमाची संकल्पना प्रस्ताविक नितीन चिलवंत यांनी केले .अरुण पवार यांनी आपली दातृत्वाची भुमिका ठेवुन कर्नाटक _ महाराष्ट्र- तेलंगणा या ठिकाणाहुन जाणाऱ्या पवित्र माती मंगल कलश संवाद यात्रासाठी सढळ हाताने आर्थिक पाठबळ उभा करु आणि सक्षमपणाने प्रत्येक ठिकाणी काम करु म्हणुन सांगितले. मराठवाडयाचे भुमिपुत्र सेंद्रीय कृषी शेती तज्ञ ज्यांचा ४० वर्षांचा अभ्यास असणारे दिलीप देशमुख बारडकर साहेबांनी मराठवाड्याच्या मातीसाठी सुंदर संकल्पना मांडली की मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव वर्षा निमित्त ‘ मराठवाडा सेंद्रीय शेती विद्यापीठ ‘ व ट्रेनिगं सेंटर उभा राहवे. मराठवाडयाची कन्या प्रसिध्द उद्योजीका डॉ. प्रिती काळे यांनी मराठवाड्यातील महिला, युवती अन् मराठवाडयाच माहेर असणाऱ्या कन्याचें सर्व पाठबळ उभा करण्यासाठी मी तन मन धन लावुन प्रयत्न करणार अस सांगितले.

स्वामी रामानंद तीर्थ जन्मस्थळ ते समाधीस्थळ ‘ पवित्र माती मंगल कलश संवाद यात्रा ‘ मराठवाड्यातील प्रत्येक जिल्हयात यशस्वी करण्यासाठी परभणी जिल्हयाची जबाबदारी उद्योजक प्रल्हाद लिपने, कामगार नेते मुंजाजी भोजने ,प्रा. डॉ. प्रविण घटे यांनी घेतली ,धाराशिव जिल्हयाची जबाबदारी ज्येष्ठ मार्गदर्शक प्रकाश इंगोले,अरुण पवार यांनी घेतली ,लातुर जिल्हयाची जबाबदारी उद्योजक अण्णासाहेब मोरे यांनी घेतली ,बीड जिल्ह्याची जबाबदारी उद्योजक शंकर तांबे यांनी घेतली, नांदेड जिल्हयाची जबाबदारी ज्येष्ठ मार्गदर्शक दिलीप देशमुख बारडकर यांनी घेतली ,जालना जिल्हयाची जबाबदारी जीवन बोराडे यांनी घेतली आणि हिंगोली अन् संभाजीनगर ( औरंगाबाद ) याची जबाबदारी नितीन चिलवंत यांनी घेतली .
देशभक्तीच्या कार्यास राजपुत समाज संघटनाचे अध्यक्ष शिवकुमारसिंह बैस यांनी पवित्र माती मंगल कलश संवाद यात्रेसाठी तन मन धन लावुन पांठीबा जाहीर केला आहे.
मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाड्याचे लढयातील वैचारीक नेतृत्व करणारे गोंविदभाई श्रॉफ, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन मानवंदना देण्यात आली. वंदे मातरम् राष्ट्रगीतांनी बैठकीची सांगता करण्यात आली.
पहिल पाऊल तर कर्मभुमितील मराठवाडा भुमिपुत्रांनी टाकले आहे आता साथ हावी जन्मभुमितील आपले माणसांची अशी साद मराठवाडा जनविकास संघाने घातली आहे.
Users Today : 9