यवतमाळ: स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ता नसल्याने नातेवाईकांना मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नाल्याच्या पुरातून वाट काढावी लागत असल्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यातील माळकिन्ही येथे घडला आहे. महागाव तालुक्यातील माळकिन्ही येथील अविनाश कलाने (वाय ४०) यांचा उपचारा दरम्यान ५ सप्टेंबर रोजी शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला.
नातेवाईकांनी अंत्यसंस्कार करण्यासाठी मृतदेह गावी आणला असता दिवसभर धुव्वाधार पाऊस पडत होता अशातच अंत्यसंस्कार करण्यासाठी इतरत्र जागा नसल्याने नाल्याच्या पैलतीरावर असलेल्या दहनशेड मध्ये अंत्यसंस्कार करण्याचे नातेवाईकांनी ठरविले. परंतु पाऊस थांबता थांबेना व नाल्याला जोरदार पूर होता व नाल्याच्या दुसऱ्या जाण्यासाठी रस्ता किंवा पूल नसल्याने व अंत्यसंस्कार करण्यासाठी वेळ होत असल्याने नातेवाईकांनी मृतदेह तिरडीवर बांधून तिरडी खांद्यावर घेऊन एकमेकांच्या सहाय्याने छातीपर्यंत पाणी असलेल्या नाल्याच्या पुरातून वाट काढीत मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.