श्रीमद भगवतगीतेतील  प्रत्येक श्लोक विश्वातील मानव जातीला दीपस्तंभ प्रमाणे मार्गदर्शक; धोंडीराम राजपूत

Khozmaster
1 Min Read
औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात जगातील सर्व शास्त्रांचे सार म्हणजे गीता ग्रंथ होय, या ग्रंथातील प्रत्येक श्लोक समुद्रातील दीपस्तंभा प्रमाणे
या जगतातील मानव जातीला मार्गदर्शक होय असे प्रतिपादन जेष्ठ नागरिक तथा बालसाहित्यक धोंडीराम
सिंह राजपूत यांनी शनिवार(ता,०३)रोजी आधार जेष्ठ
नागरिक सेवा संघाने आयोजित केलेल्या “गीता जयंती”कार्यक्रमात जगतगुरू संत तुकाराम महाराज सभागृहात केले,ते पुढे म्हणाले की,गीता ग्रंथाचे चार स्तंभ ज्ञान,-कर्म-भक्ती-ध्यान हे या भूतलावरील प्रत्येक व्यक्तीने पाळले तर त्यांच्या द्वारे सदैव विधायक कार्य होतील व जीवन आनंद दायी होईल,या प्रसंगी अध्यक्ष स्थानी नारायणी सेनेचे राज्य अध्यक्ष  अशोक पवार आप्पा होते तर व्यासपीठावर सर्वश्री अण्णासाहेब शेळके,ज्येष्ठ पत्रकार घनश्याम वाणी, अली अहमद,पोपट भोसले,उत्तमराव साळुंके,वैजीनाथ आप्पा मिटकरी यांची उपस्थिती होती,माजी आ, आर, एम,वाणी यांनी स्थापन केलेल्या या संघातर्फे सर्व प्रथम गीता ग्रंथाचे पूजन करण्यात आले,प्रार्थना आसाराम निकम यांनी सादर केली तर पसायदान उपाध्यक्ष उत्तमराव साळुंके यांनी सादर केले,डिसेंबर महिन्यात ज्या जेष्ठ नागरिकांचे वाढ दिवस होते त्यांचे गुलाब पुष्प देऊन अभिनंदन करण्यात आले, या प्रसंगी अशोक धसे,मुकुंद दाभाडे, बाबुराव वाणी, श्री निकम ,पी,बी,त्रिभुवन  ,सोपान निकम यांची उपस्थिती होती(फोटो कॅप्शन-गीता जयंती निमित्त गीता ग्रंथाचे पूजन करताना अशोक पवार, उत्तमराव साळुंके,धोंडीराम राजपूत,अण्णा साहेब शेळके)
0 9 4 5 5 2
Users Today : 17
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *